घरकूल योजना योग्य पद्धतीने राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:41 AM2021-07-31T04:41:59+5:302021-07-31T04:41:59+5:30

मानोरा पंचायत समितीत घरकूल लाभार्थींच्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार पाटणी, तर प्रमुख अतिथी म्हणून सभापती सागर जाधव, प्रभारी बीडीओ ...

Implement the home school plan properly | घरकूल योजना योग्य पद्धतीने राबवा

घरकूल योजना योग्य पद्धतीने राबवा

Next

मानोरा पंचायत समितीत घरकूल लाभार्थींच्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार पाटणी, तर प्रमुख अतिथी म्हणून सभापती सागर जाधव, प्रभारी बीडीओ जयंत शेंडे, ठाकूरसिंग चव्हाण, सरपंच प्रकाश जाधव, पंचायत समिती सदस्य प्रवीण धोटे, अभिषेक चव्हाण, महेश राऊत, मिलिंद देशमुख, डॉ. लोथे, विस्तार अधिकारी संजय भगत आदी उपस्थित होते. आमदार पाटणी पुढे म्हणाले की, लोकांना चांगले घर मिळाले पाहिजे. त्याचबरोबर चांगले आरोग्य मिळाले पाहिजे म्हणून कोरोना रोखायचा असेल तर सर्वांनी लस घ्यावी, गावागावात शिबिर घ्यावे व मानोरा तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. या वेळी पुरस्कारप्राप्त लाभार्थींचा प्रमाणपत्र देऊन आमदार पाटणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन आणि आभार प्रदर्शन अभियंता चव्हाण यांनी केले.

----------------

लसीकरणासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करावे

मानोरा तालुक्यात शंभर टक्के लसीकरण व्हावे म्हणून गावागावात सरपंच, ग्रामसेवक, युवकांंनी लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करावे, असेही आवाहन आमदार पाटणी यांनी केले. गावागावात सरपंच, ग्रामसेवक, युवकांंनी लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करावे, असेही आवाहन आमदार पाटणी यांनी केले.

Web Title: Implement the home school plan properly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.