Manmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 02:48 PM2018-09-14T14:48:16+5:302023-08-08T19:47:32+5:30

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘मनमर्जियां’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. 

Manmarziyan movie review | Manmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां?

Manmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां?

Release Date: September 14,2018Language: हिंदी
Cast: अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल
Producer: अनुराग कश्यप, आनंद एल राय, विकास बहल, विक्रमादित्य मोटवानी Director: अनुराग कश्यप
Duration: 2 तास 36 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

- जान्हवी सामंत


अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘मनमर्जियां’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे अनुराग कश्यपला आपला सूर गवसला असेच, म्हणावे लागेल.  मनाला थेट भेदणारे संगीत व कडक संवादांनी सजलेली अतिशय गुंतागुंतीच्या नात्यांची ही कथा आपला वेग आणि मार्ग शोधत मनोरंजन करते त्रूटी फक्त एकच, ती म्हणजे, कथा आणि त्यातली पात्रे इतकी क्लिष्ट आणि काही प्रमाणात गोंधळलेली आहेत की, सरतेशेवटी कुणाबद्दल सहानुभूती बाळगावी, हेच कळत नाही.
मनमर्जियां’ ही रूमी (तापसी पन्नू) या मध्यवर्ती व्यक्तिरेखेभोवती फिरणारी कथा. अतिशय उत्साही, तेवढीच धीट, बिनधास्त स्वभावाची रूमी आपल्या काकांच्या दुकानात त्यांच्यासोबत काम करत असते. डीजे सँड विकी संधूवर तिचा जीव जडतो. विकीही रूबीच्या प्रेमात आकंठ बुडतो. दोघेही अगदी बेभान होऊन प्रेम करायला लागतात. इतके की, अख्ख्या गावात त्यांच्या चोरून-लपून भेटण्याच्याचं चर्चा असतात. पण रूमी आणि विकी बेफिकिर असतात. एकदा रूमीचे आजोबा दोघांनाही रंगेहात पकडतात आणि इतके प्रेम आहेचं तर आपल्या आई-वडिलांना घेऊन लग्नाची बोलणी करायला ये, असे विकीला बजावतात. पण इतके निर्वाणीचे बजावूनही लग्नासाठी प्रयत्न करण्याऐवजी विकी लग्नाचा विषय टाळताना दिसतो आणि अखेर रूमी तिच्या कुटुंबाने निवडलेल्या मुलाशी लग्न करायला तयार होते. हा मुलगा म्हणजे रॉबी(अभिषेक बच्चन). दोघांचे लग्नही होते. पण रूमीच्या मनातला विकी निघता निघत नाही. तिकडे विकी सुद्धा लग्नालाही तयार नसतो आणि रूमीला सोडायलाही तयार नसतो. लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत रूमी विकीसोबत पळून जाण्यास तयार असते. पण विकी वेळेवर माघार घेतो आणि रूमी लग्नासाठी उभी राहते. रॉबीला सुरूवातीपासूनचं रूमी आणि विकीच्या प्रेमप्रकरणाची कल्पना असते.
लग्नानंतर रॉबी आणि रूमी यांच्यात जवळीक निर्माण व्हायला बराच वेळ लागतो. विकीला विसरणे रूमीला कठीण जाते आणि रॉबीला सगळे माहिती असूनही तो अगतिक असतो. या तिघांचा प्रवास कुठल्या वळणावर जातो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटचं बघावा लागेल.
  ‘मनमर्जियां’मधील प्रेमत्रिकोण बराच अपारंपरिक आहे. चित्रपटाचा पहिला भागाची कथा अतिशय वेगाने पुढे सरकते. रूमी व विकीचा प्रेमातील पोरकटपणा आणि त्यांची भांडण मनोरंजक वाटतात. पण दुस-या भागात या चित्रपटाची लय काहीशी बिघडते. तो काहीसा बोजड वाटतो. लग्नानंतरचे रूमी, रॉबी व विकीच्या नात्याची कुठल्याच पद्धतीने उकल करता येत नाही. साहजिकचं चित्रपटाच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखचे वागणे अनेकदा खटकते. तिच्या मनातील संभ्रम पचवणे कठीण जाते. तापसी आणि विकीने आपआपल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आहे. अभिषेक बच्चनही आपल्या संयत भूमिकेने मन जिंकतो. पण कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन भरीव असले तरी कथेचा पोकळपणा जाणवतोच. पण तरिही एकदा पाहायला हरकत नाही.

Web Title: Manmarziyan movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.