आजीने आजोबांच्या कानात सांगितली 'अशी' गोष्ट की, आजोबा लाजेने झाले लालबुंद...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 01:34 PM2021-09-27T13:34:02+5:302021-09-27T13:34:40+5:30

. वयाच्या नव्वदीतलं वृद्ध जोडपं ट्रेनमध्ये एकत्र बसलेले दिसतं. या दरम्यान, वृद्ध स्त्री आपल्या पतीशी ज्या पद्धतीने बोलते ते पाहण्यासारखे आहे.

cute old couple video is going viral on social media | आजीने आजोबांच्या कानात सांगितली 'अशी' गोष्ट की, आजोबा लाजेने झाले लालबुंद...

आजीने आजोबांच्या कानात सांगितली 'अशी' गोष्ट की, आजोबा लाजेने झाले लालबुंद...

googlenewsNext

सोशल मीडियावर तुम्हाला अनेक मजेदार कपल व्हिडीओ पाहायला मिळतील. यातील एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ दररोज व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ असे आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्ही खूप भावुक होतात, तर काही असे असतात जे पाहिल्यानंतर तुम्हाला खूप आनंद मिळतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वयाच्या नव्वदीतलं वृद्ध जोडपं ट्रेनमध्ये एकत्र बसलेले दिसतं. या दरम्यान, वृद्ध स्त्री आपल्या पतीशी ज्या पद्धतीने बोलते ते पाहण्यासारखे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरा नेटकऱ्यांनाना खूप आवडला आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ फक्त काही सेकंदांचा आहे, पण वृद्ध जोडप्याला बोलताना पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच स्मितहास्य येईल. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की, खरे प्रेम कधीच संपत नाही.

व्हायरल व्हिडीओ क्लिप पाहून असे दिसते की वृद्ध जोडपे ट्रेनमध्ये प्रवास करत आहेत. या दरम्यान, वृद्ध स्त्री ज्या पद्धतीने आपल्या पतीशी हसत आणि सतत बोलत असल्याचे दिसते, ते पाहण्यासारखे आहे. ती महिला खूप आनंदी आहे आणि तिच्या पतीला काहीतरी सांगत आहे. दरम्यान, वृद्ध पतीसुद्धा हसत हसत बायकोचे शब्द ऐकतो आणि सतत तिच्याकडे पहात राहतो.

वृद्ध दाम्पत्यामधील हे सुंदर संभाषण ट्रेनमध्येच बसलेल्या दुसऱ्या प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वृद्ध जोडप्याच्या हा क्युट व्हिडिओ इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. युजरने व्हिडिओमध्ये कॅप्शन दिले आहे, खरं प्रेम कधीच संपत नाही. सोशल मीडियावर नेटकऱ्यांना हे गोंडस जोडपं खूप आवडत आहे.

Web Title: cute old couple video is going viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.