मनमाडला सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 01:34 AM2021-11-27T01:34:15+5:302021-11-27T01:34:34+5:30

मनमाड शहरातील चंद्रभागा लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या खाकीबाग भागामध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घरातून अचानक धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. अचानकपणे लागलेल्या आगीमुळे परीसरात एकच खळबळ उडाली. चहा करत असताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांकडून हाती लागली आहे.

Manmadla cylinder explosion | मनमाडला सिलिंडरचा स्फोट

सिलिंडरच्या स्फोटामुळे घराचे झालेले नुकसान, आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशामक जवान.

Next

मनमाड : शहरातील चंद्रभागा लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या खाकीबाग भागामध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घरातून अचानक धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. अचानकपणे लागलेल्या आगीमुळे परीसरात एकच खळबळ उडाली. चहा करत असताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांकडून हाती लागली आहे. शहरातील चंद्रभागा लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या खाकीबाग भागामध्ये सायंकाळच्या सुमारास अशफाक तांबोळी यांच्या राहत्या घरात गॅसवर चहा उकळत असताना सिलिंडरमधून धूर आला आणि आग लागून भीषण स्फोट झाला. स्फोट झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांन धाव घेतली. घरातून अचानक धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. अचानकपणे लगालेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बंबाच्या साहाय्याने आगीवर पाण्याची फवारणी करण्यात आल्यानंतर आग नियंत्रणात आली. या घटनेमध्ये घराचे काही प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.-----------------

 

Web Title: Manmadla cylinder explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.