कर्नाटकात अँटी करप्शन ब्युरोची छापेमारी, सरकारी अधिकाऱ्यांकडून 72 कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 04:02 PM2021-11-26T16:02:47+5:302021-11-26T16:02:59+5:30

एसीबीच्या छाप्यादरम्यान एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरातील पाण्याच्या पाईपमधून 13 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Anti-corruption bureau raids in Karnataka, seizes assets worth over Rs 72 crore | कर्नाटकात अँटी करप्शन ब्युरोची छापेमारी, सरकारी अधिकाऱ्यांकडून 72 कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता जप्त

कर्नाटकात अँटी करप्शन ब्युरोची छापेमारी, सरकारी अधिकाऱ्यांकडून 72 कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता जप्त

googlenewsNext

बंगळुरू: गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकातील(Karnataka) विविध जिल्ह्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची(Anti Corruption Bureau) छापेमारी सुरू आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर सुरू असलेल्या या छापेमारीत आतापर्यंत 72.52 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या छाप्यात एसीबीने बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय असलेल्या 15 सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले. 

बुधवारी एसीबीच्या 503 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 68 ठिकाणी छापे टाकले. या सर्वांची 68 पथकांमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्यांच्या कारवाईत या पथकांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने, सोन्याचे दागिने, गुंतवणुकीची कागदपत्रे, शेअर बॉण्ड्स आणि जमिनीची कागदपत्रे जप्त केली आहेत. या छापेमारीत सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या उत्पनाच्या शेकडो टक्के अधिकची संपत्ती मिळाली आहे. कारवाई अजूनही सुरुच आहे.

सरकारी अधिकाऱ्यांकडे कोट्यवधीची मालमत्ता
कर्नाटक एसीबीने कलबुर्गीमधील एका पीडब्ल्यूडीचा कनिष्ठ अभियंता एस.एम. बिरादार याच्या घरातील पाण्याच्या पाईपमधून 14 लाख रुपये जप्त केले, तर घरात इतर ठिकाणी लपवलेल्या पैशांसह 4.15 कोटी जप्त केले. इतर एका अधिकाऱ्याकडून 7 किलो सोने जप्त करण्यात आले. एसीबीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार गुरुवारपर्यंत 15 सरकारी अधिकाऱ्यांकडून 72.52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बंगळुरू ग्रामीणच्या जिल्हा निर्मिती निर्मिती केंद्राचे प्रकल्प संचालक आर. एस. वासुदेव याच्याकडून एकूण 18.2 कोटींची मालमत्ता मिळाली. हा आकडा त्यांच्या उत्पन्नापेक्षा 879.53 टक्के अधिक आहे.

उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती
बंगळुरूमधील बीबीएमपीमधील ग्रुप डी कर्मचारी असलेला जीव्ही गिरी याच्या घरातून 6.24 कोटी रुपयांची मालमत्ता मिळवली आहे. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नापेक्षा 563 टक्के अधिक आहे. कलबुर्गीमधील कनिष्ठ अभियंत्याकडून जप्त केलेली संपत्ती त्याच्या उत्पन्नापेक्षा 406 टक्के अधिक आहे. गडग जिल्ह्याचे कृषी सहसंचालक टीएस रुद्रेश याच्या घरातून 6.65 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली, जी त्याच्या उत्पन्नापेक्षा 400 टक्के अधिक आहे.

Web Title: Anti-corruption bureau raids in Karnataka, seizes assets worth over Rs 72 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.