सतत पित्ताचा त्रास असल्यास असू शकतो अन्ननलिका, जठराचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:45 PM2021-12-06T17:45:27+5:302021-12-06T17:45:34+5:30

गोळ्या खाण्यावर हवे नियंत्रण : पोटविकारतज्ज्ञांकडून तपासणी गरजेची

Persistent bile problems may be esophageal, gastric or peptic ulcer | सतत पित्ताचा त्रास असल्यास असू शकतो अन्ननलिका, जठराचा आजार

सतत पित्ताचा त्रास असल्यास असू शकतो अन्ननलिका, जठराचा आजार

googlenewsNext

सोलापूर : तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना पित्त होते; पण असे पदार्थ सेवन न करताही सारखा पित्ताचा त्रास होत असेल, तर अल्सर, अन्ननलिका किंवा जठराचा आजार असू शकतो.

पित्ताचा त्रास होत असल्यामुळे अनेक जण पित्तशामक गोळ्या घेतात. सतत गोळ्या घेतल्याने त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पोटविकारतज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. पोटविकारतज्ज्ञ हे एंडोस्कोपी करून सतत पित्त होण्याचे कारण शोधून उपचार करू शकतात. त्यांच्या तपासणीत नेहमी पित्त होण्याचे कारण समोर येऊ शकते.

सतत पित्त होत असल्यास अल्सर, अन्ननलिका, जठर तसेच पोटाचा आजार असू शकतो. त्यामुळे पोटविकारतज्ज्ञांकडून तपासणी करणे गरजेचे ठरते. त्यावर वेळेवर उपचार केल्यास आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.

एखाद्यावेळी पित्ताचा त्रास होत असेल, तर पित्तशामक गोळी घ्यायला हरकत नसते; पण सारखी अशी औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणातच औषधे घ्यावीत. त्याच प्रिस्क्रिप्शनचा वापर करून अनेकदा औषधे घेऊ नयेत.

-डॉ. एच.बी. प्रसाद, औषध वैद्यक शास्त्रतज्ज्ञ

---------

ॲसिडिटीत पोटात दुखत असेल तर

ॲसिडिटीत पोटात दुखत असेल, तर जठराच्या आतील अस्तर उघडे पडून तिथे अल्सर (व्रण) झालेला असू शकतो. जठराचे आतले आवरण मजबूत असते. पित्त सहन करण्याची क्षमता असूनही तिथे जखम होऊन फाटू शकते. असा अल्सर झाल्यास त्या ठिकाणच्या नसा उघड्या पडतात आणि त्यावर आम्लाची प्रक्रिया होऊन पोटात दुखते.

-----------

...तर दुर्लक्ष नका करू

प्रत्येक जळजळ किंवा उलटी ही ॲसिडिटीच असेल असे नाही. पोट किंवा छातीत सतत वेदना होणे, वजन कमी होणे, खायची इच्छा कमी होणे, सतत उलटी होणे, उलटी किंवा शौचावाटे रक्त जाणे, शौचास काळ्या रंगाची होणे, अशी लक्षणे दिसत असतील, तर मात्र त्याला केवळ ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करू नका.

Web Title: Persistent bile problems may be esophageal, gastric or peptic ulcer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.