VIDEO : वाह रे बर्थडे सेलिब्रेशन! अर्धनग्न करून शिडीवर बांधलं आणि मग केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 02:49 PM2021-09-06T14:49:17+5:302021-09-06T14:49:49+5:30

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका मित्राचा बर्थ डे साजरा करण्यासाठी मित्रांनी भलतंच काहीतरी केलं.

Viral video of weird birthday celebration tie half naked on a ladder then do this condition | VIDEO : वाह रे बर्थडे सेलिब्रेशन! अर्धनग्न करून शिडीवर बांधलं आणि मग केलं असं काही...

VIDEO : वाह रे बर्थडे सेलिब्रेशन! अर्धनग्न करून शिडीवर बांधलं आणि मग केलं असं काही...

googlenewsNext

जेव्हाही एखाद्या व्यक्तीचा बर्थ डे असतो तेव्हा त्याचे मित्र पार्टीची डिमांड करतात आणि केस कापण्यापासून खाण्या-पिण्याचं एन्जॉय करतात. काही लोकांना घरीच पार्टी करणं आवडतं त काही लोकांना बाहेर फिरून वाढदिवस साजरा करणं आवडतं. अनेकदा तर वाढदिवसाच्या दिवशी बर्थ डे बॉयला मित्र मारतात सुद्धा. असे प्रकार कॉलेज आणि होस्टेलमध्ये जास्त बघायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका मित्राचा बर्थ डे साजरा करण्यासाठी मित्रांनी भलतंच काहीतरी केलं.

अनेकदा बर्थ डे सेलिब्रेट करतेवेळी केली जाणारी गंमत इतकी विचित्र असते की, बघणारे हैराण होतात. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एका मित्राला बर्थ डे निमित्त आधी त्याला एका लोखंडी शिडीवर बांधलं आणि नंतर रस्त्यावर ठेवलं. नंतर त्याच्या कलर फोम टाकला. बर्थ डे बॉयची अशी हालत झाली होती की, तो ओळखायलाही येत नव्हता.

हे इतक्यावरच थांबलं नाही तर मित्रांनी शिडी एका भिंतीला लागून ठेवली. तो पूर्णपणे गुलाबी आणि पांढऱ्या रंगाने माखला होता. त्याला ओळखणंही अवघड झालं होतं. मित्रांनी त्याला एखाद्या दोषीप्रमाणे शिडीला बांधलं आणि व्हिडीओ काढला. या बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

फेसबुकवर हा व्हिडीओ बिभुप्रकाश गिरी नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ कोटी ४० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी व्हिडीओ लाइक केला. लोकांच्या यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. 
 

Web Title: Viral video of weird birthday celebration tie half naked on a ladder then do this condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.