Next

अफजल गुरूच्या मुलाला हवाय पासपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 09:46 AM2019-03-06T09:46:00+5:302019-03-06T09:46:43+5:30

नवी दिल्ली - संसदेवर दहशतवादी हल्ला केल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अफजल गुरूच्या मुलाने केंद्र सरकारकडे आपल्याला पासपोर्ट मिळावा, अशी ...

नवी दिल्ली - संसदेवर दहशतवादी हल्ला केल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अफजल गुरूच्या मुलाने केंद्र सरकारकडे आपल्याला पासपोर्ट मिळावा, अशी मागणी केली आहे. गालिब गुरूअसे अफजल गुरूच्या मुलाचे नाव आहे. गालिब गुरू याला परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे. यासाठी, पासपोर्ट मिळाला तर परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेता येईल, असे गालिब गुरू याने म्हटले आहे.