VIDEO : १८७ किलो वजनी गोरिल्लावर असा केला उपचार, आधी कधी पाहिलं नसेल.....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 05:20 PM2021-09-28T17:20:15+5:302021-09-28T17:26:22+5:30

अमेरिकेतील मियामी झूमद्ये याच्या काही टेस्ट केल्या गेल्या. त्यादरम्यान हे त्याचे फोटो काढले. या टेस्टमध्ये त्याचं रक्त तपासण्यात आलं. त्याचा एक्स-रे काढण्यात आला. 

Gorilla undergoing a medical procedure pics and videos will shock you | VIDEO : १८७ किलो वजनी गोरिल्लावर असा केला उपचार, आधी कधी पाहिलं नसेल.....

VIDEO : १८७ किलो वजनी गोरिल्लावर असा केला उपचार, आधी कधी पाहिलं नसेल.....

Next

वर फोटोत दिसत असलेल्या  गोरिल्लाचं नाव आहे बार्नी. तुम्ही मनुष्यांना तर हॉस्पिटलमद्ये लेटलेलं अनेकदा पाहिलं असेल. पण १८७ किलो वजनाच्या गोरिल्लाला अशाप्रकारे पाहिलं नसेल. या गोरिल्लाचं वजन आहे २५ वर्षे. अमेरिकेतील मियामी झूमद्ये याच्या काही टेस्ट केल्या गेल्या. त्यादरम्यान हे त्याचे फोटो काढले. या टेस्टमध्ये त्याचं रक्त तपासण्यात आलं. त्याचा एक्स-रे काढण्यात आला. 

मियामी झूमधील असोसिएट डॉक्टर जिम्मी जॉनसन ही केस लीड करत होते. ही घटना २०१८ मधील आहे. त्याच्या फुप्फुसात काही समस्या झाल्याने त्याला खूप कफ झाला होता डॉक्टरांनी तोंड उघडून त्याची तपासणी केली.

गोरिल्लाचं वजन इतकं जास्त होतं की, यावेळी अनेक लोक मिळून त्याला उचलत होते. त्याला बेशुद्ध करण्यात आलं. तो तीन तासांपर्यंत बेशुद्ध होता. त्यानंतर त्याचं हृदय चेक करण्यात आलं. त्याचं ब्लड प्रेशर चेक करण्यात आलं जे सामान्य होतं. 

झू मियामीने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात बघू शकता की, काही डॉक्टर्स आणि नर्सेजची टीम  गोरिल्लावर उपचार करत आहेत. त्याला रिकव्हरीनंतर त्याच्या भागात सोडण्यात आलं.
 

Web Title: Gorilla undergoing a medical procedure pics and videos will shock you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.