येडशीजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 22 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 09:19 AM2018-08-03T09:19:54+5:302018-08-03T09:27:04+5:30

लातूर-पूणे राज्य मार्गावर येडशीजवळ उभ्या असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.

22 passengers injured in road accident near osmanabad | येडशीजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 22 प्रवासी जखमी

येडशीजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 22 प्रवासी जखमी

googlenewsNext

येडशी (जि.उस्मानाबाद) - लातूर-पूणे राज्य मार्गावर येडशीजवळ उभ्या असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास २२ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी गंभीर जखमींना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

मुंबईहून लातूरकडे प्लास्टिक घेऊन निघालेला ट्रक (क्र. एमएच.११/ एएल.४२९१) डिझेल संपल्यामुळे येडशीजवळ रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. याचवेळी पुण्याहून लातूरकडे निघालेल्या ट्रॅव्हलने (क्र.एमएच.२४/ए.बी.५५८८) सदरील उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात जवळपास २२ प्रवासी जखमी आहेत. यापैकी ७ ते ८ गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: 22 passengers injured in road accident near osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात