परभणी रेल्वे स्थानकावर सरकता जिना उभारणीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:18 AM2017-12-26T00:18:04+5:302017-12-26T00:18:26+5:30

येथील रेल्वेस्थानकावर सरकता जिना (एक्सलेटर) बसविण्याच्या कामाला आठ दिवसांपासून प्रारंभ झाला आहे़ या कामाने आता वेग घेतला आहे़

The speed at which the speed of the work is taken at Parbhani railway station | परभणी रेल्वे स्थानकावर सरकता जिना उभारणीच्या कामाला वेग

परभणी रेल्वे स्थानकावर सरकता जिना उभारणीच्या कामाला वेग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील रेल्वेस्थानकावर सरकता जिना (एक्सलेटर) बसविण्याच्या कामाला आठ दिवसांपासून प्रारंभ झाला आहे़ या कामाने आता वेग घेतला आहे़
परभणी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर जाण्यासाठी दादºयाचा वापर करावा लागत आहे़ रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर औरंगाबाद, मनमाड, मुंबईकडे जाणाºया रेल्वे गाड्या कायमस्वरुपी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबत असल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत अधिकच भर पडली होती़
या पार्श्वभूमीवर परभणी स्थानकावर मंजूर असलेला सरकता जीना आणि लिफ्ट त्वरित बसवावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली़ विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी एक्सलेटर बसविण्याचे साहित्यही स्थानकावर येऊन पोहचले होते़ मात्र हे साहित्य काही दिवसांतच दुसरीकडे हलविण्यात आले़ त्यामुळे एक्सलेटरचा प्रश्न रखडून पडला होता़ प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता़ परभणी रेल्वे स्थानकावर एक्सलेटर बसवावे, यासाठी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाºयांसह प्रवाशांनी वेळोवेळी पाठपुरावा केला़ या पार्श्वभूमीवर आठ दिवसांपूर्वी एक्सलेटर बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे़ प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर पोलीस चौकीच्या बाजूने एक्स्लेटर उभारणीचे काम सुरू झाले आहे़ या कामाला आता गती मिळाली असून, येत्या चार-पाच दिवसांत प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील काम पूर्ण होईल. त्यानंतर प्लॅटफॉर्म क्र.२ वर हे काम केले जाणार आहे. एक्सलेटर बसविण्याचे काम सुरू झाल्याने प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे.
कोच लोकेटरही बसविणार
परभणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कोचचे लोकेशन दाखविणारे डिजीटल फलक नसल्याने प्रवाशांची तारांबळ होत आहे़ विशेष म्हणजे, आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्यांचा आरक्षित डबा नेमका कोठे येईल, याचा अंदाज बांधता येत नसल्याने प्रवाशांची ऐनवेळी धावपळ होत होती़ या ठिकाणी कोचचे लोकेशन दाखविणारे लोकेटर बसवावे, अशी मागणीही रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली़ या मागणीची दखल घेत कोच लोकेटरचे कामही लवकरच सुरू केले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली़

Web Title: The speed at which the speed of the work is taken at Parbhani railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.