Next

रत्नागिरीतील महसूल कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 06:12 PM2017-10-10T18:12:23+5:302017-10-10T18:21:18+5:30

रत्नागिरी : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येथील महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सरकार दखल घेत नाही ...

रत्नागिरी : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येथील महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सरकार दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. गेली ३-४ वर्षे सरकार फक्त आश्वासन देत आहे. या मागण्यांच्या पुर्ततेबाबत निर्णय मात्र झालेला नाही. दरम्यान ३ ऑक्टोबरपासून सुरू झालेले पुरवठा कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे.