‘नॅब’चा दृष्टीबाधितांना मदतीचा हात; देणार १ हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 07:48 PM2020-10-19T19:48:09+5:302020-10-19T19:55:06+5:30

या उपक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नॅब लातूर शाखा, रोटरी क्लब आॅफ लातूर होरायझनवर सोपविण्यात आली आहे़

‘NAB’s helping hand to the visually impaired; Will give 1 thousand rupees | ‘नॅब’चा दृष्टीबाधितांना मदतीचा हात; देणार १ हजार रुपये

‘नॅब’चा दृष्टीबाधितांना मदतीचा हात; देणार १ हजार रुपये

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्यातील दृष्टीबाधितांना मदत

लातूर : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड इंडिया (नॅब) मुंबईतर्फे  मराठवाड्यातील दृष्टीबाधितांच्या बँक खात्यावर १ हजार रुपये जमा केले जाणार आहेत़ कोविड काळामध्ये दृष्टीबाधित कुटुंब हलाखीचे जीवन जगत आहे़ त्यामुळे ‘नॅब’ने हा उपक्रम हाती घेतला आहे़ या उपक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नॅब लातूर शाखा, रोटरी क्लब आॅफ लातूर होरायझनवर सोपविण्यात आली आहे़

या उपक्रमातंर्गत प्रत्येक दृष्टी बाधिताच्या खात्यावर १ हजार रुपये जमा क रण्यात येणार आहे़ यासाठी दृष्टी बाधितांनी ३१ आॅक्टोबर २०२० पर्यंत आधार कार्डची झेरॉक्स, बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड, शाखेचे नाव, दृष्टी बाधित असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, संपुर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आदी माहीती नॅब लातूर कार्यालय, डॉ़ विजय राठी, आशिर्वाद, सिग्नल कॅम्प, लातूर या पत्त्यावर स्वत: आणून द्यावे, असे आवाहन सुहास कर्णिक, माधव गोरे, डॉ़ मल्लिकार्जुन हूलसुरे, निळकंट स्वामी यांनी केले आहे़ नॅब ही संस्था गेल्या ६० वर्षांपासून दृष्टी बाधितांचे शिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन, आरोग्य आणि ब्रेन लिपी क्षेत्रामध्ये काम करीत आहे़ १८ राज्यामध्ये काम विस्तारले असून सदर उपक्रम नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड इंडिया मुंबई, रोटरी क्लब आॅफ लातूर होरायझनतर्फे राबविण्यात येत आहे.
 

Web Title: ‘NAB’s helping hand to the visually impaired; Will give 1 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.