Goa Election 2022 : गेम झाला! काँग्रेस सोडून तृणमूलच्या गोटात; मग पुन्हा माघारीच्या विचारात; आता ना घर का, ना घाट का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 07:54 AM2022-01-20T07:54:10+5:302022-01-20T07:54:40+5:30

तृणमूल काँग्रेसमध्ये माझी केवळ घुसमट आणि भ्रमनिरासच झाला; मी चुकलो, मला माफ करा, असं ते यापूर्वी म्हणाले होते.

goa election 2022 former mla left congress alex reginald did not get ticket will fight independent now | Goa Election 2022 : गेम झाला! काँग्रेस सोडून तृणमूलच्या गोटात; मग पुन्हा माघारीच्या विचारात; आता ना घर का, ना घाट का

Goa Election 2022 : गेम झाला! काँग्रेस सोडून तृणमूलच्या गोटात; मग पुन्हा माघारीच्या विचारात; आता ना घर का, ना घाट का

googlenewsNext

पणजी : उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केलेले आलेक्स रेजिनाल्ड यांनी घरवापसीची तयारी केल्यानंतरही त्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली आहे. पक्षाने कुडतरीत मॉरेन रिबेलो यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेस पक्षाची उमेदवारीची पाचवी यादी जाहीर झाली आहे. त्यात कुडतरीचे उमेदवार म्हणून मॉरेन रिबेलो यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे  रेजिनाल्ड यांचा पत्ता कापला गेला आहे. जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या यादीत शिवोली मतदारसंघात मायकल लोबो यांच्या पत्नी डिलायला लोबो, साळगावात केदार नाईक, हळदोणेत कार्लोस आल्वारीस फारिया तर प्रियोळात दिनेश जल्मी यांना उमेदवारी देण्यात आल्या आहेत.

रेजिनाल्ड अपक्ष लढणार
‘ना घर का, ना घाट का’ अशी स्थिती झालेल्या माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांनी अखेर कुडतरी मतदारसंघात अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने कुडतरीतील आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर रेजिनाल्ड यांनी तातडीने आपले  समर्थक व कार्यकर्त्यांची  बैठक  बोलावून पुढील रणनीती ठरवली. कार्यकर्ते व समर्थकांच्या आग्रहासाठी आपण अपक्ष लढणार, असे त्यांनी त्यानंतर जाहीर केले.  

आपण तीन वेळा आमदार म्हणून  निवडून आलो; पण कुडतरी मतदारसंघाला एकही वेळा मंत्रिपद मिळवून देऊ शकलो नाही. विधानसभेत जास्त काळ विरोधी गटाच्या बाकावर बसून काढला. सरकारच्या विरोधात आवाज उठविला.  विरोधी पक्षनेते जेवढा आवाज उठवू शकले  नाहीत, त्याच्या पलीकडे जाऊन आपण सरकारच्या विरोधात आवाज उठविलेला आहे; पण विरोधी बाकावर बसून कुठलाही आमदार अपेक्षेप्रमाणे मतदारसंघाचा व लोकांचा विकास करू शकत नाही. गेली अनेक वर्षे आपल्याला ही खंत सतावत होती. त्यामुळे आपण  पक्ष बदलाचा निर्णय घेतला होता व तृणमूलमध्ये प्रवेश केला; परंतु महिनाभरातच आपल्याला तृणमूलमध्ये वातावरण एकदम गढूळ असल्याचे कळून चुकले, असे ते म्हणाले.

मांद्रे गोवा फॉरवर्डला
कॉंग्रेसने शेवटी मांद्रेतील जागा गोवा फॉरवर्डसाठी सोडली आहे. तशी माहिती कॉंग्रेसचे  प्रभारी दिनेश गुंडुराव यांनी दिली. गोवा  फॉरवर्डने आग्रह धरलेल्या चार मतदारसंघांपैकी मांद्रे  एक होता.  गोवा फॉरवर्डतर्फे दीपक कलंगूटकर लढणार आहेत.   

Web Title: goa election 2022 former mla left congress alex reginald did not get ticket will fight independent now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.