१५ वर्षांनंतर नव्या रूपात लाँच झाला Nokia 6310; आयकॉनिक Snake गेमही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 05:33 PM2021-10-16T17:33:19+5:302021-10-16T17:39:29+5:30

Nokia 6310 : पाहा किती आहे किंमत. सर्वात पहिल्यांदा हा फोन २००१ मध्ये लाँच करण्यात आला होता.

जर तुम्ही नोकिया (Nokia) फोन्सना आजही मिस करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. नोकिया या कंपनीनं नोकिया 6310 हा फोन नव्या डिझाईनसह पुन्हा एकदा लाँच केला आहे.

हा फोन एक मजबूत फोन म्हणून प्रसिद्ध झाला होता. म्हणूनच जगभरातीलं लोकं या फोनला ब्रिक म्हणजेच वीट असं म्हणायला लागले होते. नोकियानं पहिल्यांदा २००१ मध्ये हा फोन लाँच केला होता. त्यानंतर 6310i हे त्याचं अपडेटेड व्हर्जन लाँच करण्यात आलं होतं.

परंतु २००५ मध्ये कंपनीनं फोन कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता याच्या २० व्या वर्षपूर्तीनिमित्तानं क्लासिक फोन 6310 चं एक नवं व्हर्जन लाँच केलं होतं.

भलेही या फोनचं फ्रेश युनिट १५ वर्षांपासून बाजारात आलं नाही, परंतु आजही लोकांमध्ये हा फोन अतिशय लोकप्रिय आहे.

असे काही जण आजही सापडतील जे 3310 आणि 6310 हे फोन त्यांच्या टिकाऊपणामुळे आणि बॅटरीसाठी बॅकअप म्हणून वापरत आहेत. या फोनमध्ये तुम्हाला स्नेक हा गेम खेळण्याचा पर्याय होता. तसंच एक मोनोफोनिक रिंगटोनही तयार करता येत होती.

मर्यादित पर्याय असले तरी हा फोन नोकियाच्या सर्वाधिक विक्री झालेल्या फोनपैकी एक ठरला होता. नवा नोकिया 6310 हा काही बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 320*240 पिक्सेल डेफिनेशन, उत्तम रिडेबलिटीसह मोठा कर्व्ह्ड डिस्प्लेही यात देण्यात आला आहे.

या फोनमध्ये एक कमेरा देण्यात आला आहे. तसंच यामध्ये तीन कलर ऑप्शन्सही आहेत. नोकियाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार या फोनची किंमत £59.99 म्हणजेज जवळपास ६ हजार रूपये इतकी आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच हा फोन पुन्हा लाँच करण्याची घोषणा करण्यात आली होती.

नोकिया 6310 आजच्या कनेक्टेड युझर्ससाठी एक क्लासिक रीइमेजिनेटेड आहे. अॅडव्हान्स्ड अॅक्सेसिबिलिटी, ऑप्टिमाईज्ड अॅर्गोनॉमिक्स आणि बॅटरी लाईफसाठी नोकिया ही कंपनी ओळखली जाते. या फोनच्या नव्हा व्हर्जनमध्ये स्नेक हा गेमही मिळतो.

याच्या मूळ गोष्टींसह, पुश पुल बटन आणि डिस्प्ले टचस्क्रिन टाईमला आणखी सोपं आणि सहज आणि आनंददायक अनुभव देणारे बनवत असल्याची प्रतिक्रिया कंपनीच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.