यशस्वी झेप! वडिलांनी नातेवाईकाकडून मागून आणला लॅपटॉप; 3 बहिणींनी परिक्षेत 'असं' केलं टॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 03:31 PM2022-01-18T15:31:49+5:302022-01-18T15:43:13+5:30

सर्वोदय विचार परीक्षेत नागोरच्या तीन बहिणींनी टॉप केलं आहे. या तिघीचं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आल्या.

father had brought laptop after asking relative now dream of becoming an ias | यशस्वी झेप! वडिलांनी नातेवाईकाकडून मागून आणला लॅपटॉप; 3 बहिणींनी परिक्षेत 'असं' केलं टॉप

फोटो - दैनिक भास्कर

Next

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक कौतुकास्पद घटना घडली आहे. राजस्थानमधील एकाच कुटुंबातील तीन बहिणींनी कमाल केली आहे. सर्वोदय विचार परीक्षेत नागोरच्या तीन बहिणींनी टॉप केलं आहे. या तिघीचं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आल्या. तीनही बहिणींमध्ये रितू सर्वात मोठी असून ती अकरावीत शिकते. रितूने जिल्ह्यात टॉप केलं आहे. तर सपना आणि कोमल या दोघींनी अनुक्रमे दुसऱा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

सपना रितूच्या काकांची मुलगी आहे तर कोमल आत्याची मुलगी आहे. रितूने दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेचा अभ्यासक्रम ऑनलाईन होता. ज्यामध्ये तब्बल 12 पुस्तकांचा अभ्यासक्रम होता. पण आमच्याकडे लॅपटॉप नव्हता. म्हणून वडिलांनी एका नातेवाईकाकडून काही दिवसांसाठी लॅपटॉप मागून आणला. यानंतर 12 पुस्तकांचा अभ्यासक्रम अवघ्या 40 दिवसांत आम्ही पूर्ण केला आहे. आम्ही तिघी दिवसातील 4 ते 5 तास अभ्यास करतो. 

45 मिनिटांत सोडवला संपूर्ण पेपर 

परीक्षेत रितूने 100 पैकी 91, सपनाने 89 आणि कोमलने 87 मार्क मिळवले आहेत. रितूने सांगितलं की, परीक्षेत 100 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होते. ज्यापैकी 90 प्रश्न सोडवायचे होते. तिघींनी 45 मिनिटांत संपूर्ण पेपर सोडवला. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे जीवन मुल्य आणि सिद्धांताविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी राज्यात 212 परीक्षा केंद्रात सर्वोदय विचार परीक्षा आयोजित केली जाते. 

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून IAS होण्याची इच्छा

बाल दिवसाच्या निमित्ताने आयोजित या परीक्षेत 58 हजार 676 विद्यार्थी सामील झाले होते. इयत्ता 9 ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप-2 च्या परीक्षेत 100 ऑब्जेक्टिव प्रश्न होते. यापूर्वी रितूने प्रतिभा खोज परीक्षेत राज्यात सातवा नंबर पटकावला होता. या तिघींनी सांगितलं की, त्यांना अभ्यासासाठी कुटुंबाकडून पाठिंबा मिळत आहे. तिघी बहिणी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून IAS होऊ इच्छितात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: father had brought laptop after asking relative now dream of becoming an ias

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.