​International Sports Day : अभिनयाबरोबरच 'खेळा'मध्येही पारंगत आहेत 'हे' सेलेब्स...!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 06:22 AM2018-04-06T06:22:38+5:302018-04-06T12:15:18+5:30

-रवींद्र मोरे  प्रत्येकाच्या आयुष्यात खेळाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. विशेषत: अन्य खेळाडूंप्रमाणेच आपले लाडके सेलेब्सही खेळाला तेवढेच महत्त्व देताना ...

International Sports Day: Acting along with acting, 'Hey' Celebs ...! | ​International Sports Day : अभिनयाबरोबरच 'खेळा'मध्येही पारंगत आहेत 'हे' सेलेब्स...!

​International Sports Day : अभिनयाबरोबरच 'खेळा'मध्येही पारंगत आहेत 'हे' सेलेब्स...!

googlenewsNext
ong>-रवींद्र मोरे 
प्रत्येकाच्या आयुष्यात खेळाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. विशेषत: अन्य खेळाडूंप्रमाणेच आपले लाडके सेलेब्सही खेळाला तेवढेच महत्त्व देताना दिसतात. अभिनय कौशल्याबरोबरच ते स्वत:ला फिट आणि स्मार्ट ठेवण्यासाठी खेळाला ते अविभाज्य घटक मानतात. साहजिकच फिटनेस आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा मोठा स्त्रोत म्हणजे खेळ होय. आज आपण अशाच काही सेलेब्सबाबतीत जाणून घेऊया जे अभिनयाबरोबरच त्यांच्या आवडत्या खेळासाठीही ओळखले जातात.  



* तापसी पन्नू- स्क्वॉश
तापसी पन्नूला स्क्वॉश खेळणे खूपच आवडते. विशेष म्हणजे ती गेल्या बºयाच वर्षांपासून हा खेळ खेळत असून हाच खेळ तिच्या फिटनेसचे रहस्य आहे, असे तिचे म्हणणे आहे. बऱ्याचदा शूटिंगदरम्यान ती फावल्या वेळात आपल्या सहकाºयांसोबत स्क्वॉश खेळताना दिसते.  

Related image

* रणदीप हुडा - हॉर्स रायडिंग आणि पोलो
रणदीप एक व्यावसायिक हॉर्स रायडर आहे आणि त्याला बऱ्याच घोडेस्वारी स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. घोडेस्वारी बरोबरच तो एक प्रखर पोलो खेळाडूदेखील आहे. रणदीपने अभिनय कौशल्याबरोबरच दोन्हीही खेळांचे कौशल्य अगदी निपूणतेने जपले आहे. जिमबरोबरच नियमित घोडेस्वारी आणि पोलो हा आपला फिटनेस फंडा आहे असे त्याचे म्हणणे आहे.   



* दीपिका पादुकोण- बॅडमिंटन
दीपिका पादुकोणच्या फिटनेस रहस्यामध्ये जिमपेक्षा बॅडमिंटन खेळाला खूपच महत्त्व आहे. मुळात ती बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोणची मुलगी असून दीपिकाने बॅडमिंटन खेळात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. बºयाचजणांना हे माहित नाही की, ती राज्यस्तरीय बेसबॉलपटू देखील होती. विशेष म्हणजे खेळाप्रती प्रेम हा गुण तिच्यात वंश परंपरागत असून ती शूटिंगमध्ये नसताना बॅडमिंटन खेळतानाच दिसते.    



* अली फझल- बास्केटबॉल
फुकरे चित्रपटाचा अभिनेता अली फजल बॉलिवूड पदार्पण करण्या अगोदर एक राज्यस्तरीय बास्केटबॉल खेळाडू होता. त्याला हा खेळ एवढा आवडत होता की, तो त्या खेळात करिअर करु  इच्छित होता. मात्र काही कारणास्तव तो या चंदेरी दुनियेत आला. जेव्हाही अली तणावग्रस्त असेल तेव्हा तो खेळाच्या माध्यमातून तणावमुक्त होतो. विशेषत: अशावेळी त्याला आपले शालेय जीवन आठवते. बऱ्याचदा आपणास तो हा खेळ खेळताना, पाहताना तसेच प्रमोट करतानाही आढळतो.  



* टायगर श्रॉफ - तायक्वॉँदो
बॉलिवूडचा प्रिमियम अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफला बालपणापासून जिम्नॅस्टिक आणि मार्शल आर्ट्समध्ये प्रशिक्षित केले आहे. टायगरने अगदी कठोर प्रशिक्षण घेत अनेक मार्शल आर्ट्सवर मात केली आहे. टायगरने आतापर्यंत कलारिपयट्टू, आधुनिक कुंग फू, क्रव मेगा आणि सिलाट अशा वेगवेगळ्या निपूणता शिकला आहे. पण तायक्वोंडोच्या स्पर्धात्मक खेळामध्ये तो आपल्या अविश्वसनीय कौशल्याचा उपयोग करून त्याला वेगळे करतो. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये तो एकमेव मार्शल आर्ट्स प्रकारात ५ वी डिग्री ब्लॅक बेल्ट आहे. 

Web Title: International Sports Day: Acting along with acting, 'Hey' Celebs ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.