'तानाजी' सिनेमासाठी अजय -काजोल पोहचले 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर, अशी केली धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:30 AM2020-01-06T06:30:00+5:302020-01-06T06:30:00+5:30

‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हे कलाकार येणार म्हंटल्यावर थुकरट वाडीतील विनोदवीरांनी एकच कल्ला केला.

Ajay-Kajol at Chala Hawa Yeu Dya Show For Tanhaji Movie Promotion | 'तानाजी' सिनेमासाठी अजय -काजोल पोहचले 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर, अशी केली धमाल

'तानाजी' सिनेमासाठी अजय -काजोल पोहचले 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर, अशी केली धमाल

googlenewsNext

'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोनं अवघ्या महाराष्ट्राला हसवत मनोरंजन केलं आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर जगभरातील मराठी रसिकांवर चला हवा येऊ द्या या शोनं जादू केली आहे. आजपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी या शोमध्ये येऊन मराठी रसिकांचे मनोरंजन केले आहे. हा शो सा-यांसाठी एक स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. 

आता येत्या आठवड्यात थुकरट वाडीत तानाजी या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री काजोल आणि अभिनेता देवदत्त नागे, अजिंक्य देव हजेरी लावणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हे कलाकार येणार म्हंटल्यावर थुकरट वाडीतील विनोदवीरांनी एकच कल्ला केला. 

 


'प्यार तो होना हि था' या सिनेमावर एक विनोदी स्किट सादर करतील, ज्यात भाऊ कदम अजय देवगण आणि श्रेया बुगडे काजोलची व्यक्तिरेखा साकारणार आहेत आणि त्यांना पाहून प्रेक्षक हसून हसून लोटपोट होतील यात शंकाच नाही.  या स्किटला काजोल आणि अजय यांनी भरभरून दाद दिली. धमाल मस्तीने भरलेला हा भाग लवकरच पाहायला मिळणार आहे. 


अजय देवगणलाही या सिनेमाची जास्त उत्कंठा आहे. कारण, 'तानाजी' हा अजय देवगणची सेंच्युरी पूर्ण करणार आहे. अजयच्या लाईफमधील 100 वा सिनेमा म्हणून तानाजी सिनेमाची नोंद होत आहे. लोकमत मोस्ट स्टाईलिश अवॉर्डमध्ये अजयने शतकी खेळीबद्दल उत्साही असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: Ajay-Kajol at Chala Hawa Yeu Dya Show For Tanhaji Movie Promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.