खूशखबर! म्हाडा मुंबईशेजारी मोठे 'शहर' निर्माण करणार; पाऊण लाख परवडणारी घरे बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 10:10 AM2022-05-14T10:10:57+5:302022-05-14T10:12:38+5:30

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प मंजूर करण्यासाठी म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Construction of 75 thousand 981 affordable houses in Vasai; MHADA Security Smart City Project | खूशखबर! म्हाडा मुंबईशेजारी मोठे 'शहर' निर्माण करणार; पाऊण लाख परवडणारी घरे बांधणार

खूशखबर! म्हाडा मुंबईशेजारी मोठे 'शहर' निर्माण करणार; पाऊण लाख परवडणारी घरे बांधणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न साकार व्हावे म्हणून म्हाडा सातत्याने क्रियाशील असून, आता वसई येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३६० एकरवर सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. म्हाडाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर हा प्रकल्प मंजूर केला आहे आणि या प्रकल्पात ७५ हजार ९८१ घरे उभारली जातील.

म्हाडाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प मंजूर करण्यासाठी म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॉन्सेपच्युअल  ॲडव्हायजरी सर्व्हिसेस एलएलपी कंपनीच्या वसई येथील प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
सुरक्षा स्मार्ट सिटीमार्फत सोडतीद्वारे याचे वितरण होईल. अत्यल्प उत्पन्न गटात ४५ हजार १७२ घरे असतील. त्यापैकी २७ हजार घरे म्हाडाच्या दरानुसार सोडतीसाठी असतील. अल्प उत्पन्न गटात ३० हजार ८२९ घरे असणार आहेत. यापैकी १७ हजार घरे म्हाडा दराप्रमाणे उपलब्ध होतील. घरांची किंमत २२ लाख ५० हजार रुपये असेल. अत्यल्प गटातील विजेत्यांना २.५ लाखांची सवलत मिळेल. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी पीएमएवायचे अनुदान मिळणार नाही. अत्यल्प उत्पन्न गटाला मुद्रांक शुल्काची रक्कम १ हजार आहे. अत्यल्प गटातील २ हजार ५०० घरांची सोडत ३१ मे रोजी काढली जाईल. 

अत्यल्प उत्पन्न गटासाठी : 
३०६ चौरस फुटांचे घर 
अल्प उत्पन्न गटासाठी : 
३२० चौरस फुटांचे घर

Web Title: Construction of 75 thousand 981 affordable houses in Vasai; MHADA Security Smart City Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा