हिरोईन बनली सपना चौधरी! पाहा, डेब्यू सिनेमाचा फर्स्ट लूक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 02:58 PM2018-11-01T14:58:54+5:302018-11-01T14:59:53+5:30

होय, सपनाचा डेब्यू सिनेमा ‘दोस्ती के साईड इफेक्ट’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

haryanvi dancer sapna choudhary bollywood debut movie dosti ke side effects first poster |   हिरोईन बनली सपना चौधरी! पाहा, डेब्यू सिनेमाचा फर्स्ट लूक!!

  हिरोईन बनली सपना चौधरी! पाहा, डेब्यू सिनेमाचा फर्स्ट लूक!!

googlenewsNext

हरियाणवी डान्सर सपना चौधरी सध्या जोरात आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून सपनाने फक्त आपला लूकचं बदलला नाही तर कामही बदलले आहे. थांबा...थांबा... सपनाने डान्स वगैरे सोडलेला नाही. पण होय, आता सपना केवळ डान्सर राहिली नसून अभिनेत्रीही बनली आहे. ती सुद्धा बॉलिवूड अभिनेत्री. सपना बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय, ही बातमी आम्ही तुम्हाला आधीच दिली होती. आता सपनाच्या डेब्यू सिनेमाचे पहिले  मोशन पोस्टर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

होय, सपनाचा डेब्यू सिनेमा ‘दोस्ती के साईड इफेक्ट’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. या चित्रपटात सपनाच्या अपोझिट अभिनेता विक्रांत आनंद लीड रोलमध्ये आहे. याशिवाय जुबेर के खान, अंजू जाधव हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट १४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
जोयल डॅनिअलची निर्मिती असलेला हा चित्रपट हादी अली अबरार दिग्दर्शित करणार आहे. ‘कसौटी जिंदगी की’चे जुबैर खान आणि अंजू जाधव यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बिग बॉसच्या ११ व्या सीझनमध्ये सपना चौधरी दिसली होती. या घरातील तिचा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. सध्या सपना चर्चेत आहे ती तिच्या मेकओव्हरमुळे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर सपनाने जबरदस्त ग्लॅमरस मेकओव्हर केला आहे.
सपनाने खूप लहान वयात स्टेजला आपलेसे केले. वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रीय आहे. तिने गायलेले ‘है सॉलिड बॉडी’ हे गाणे तुफान गाजले होते. सपना १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढ्या लहान वयात तिला घरची जबाबदारी उचलावी लागली. त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली.  

Web Title: haryanvi dancer sapna choudhary bollywood debut movie dosti ke side effects first poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.