नाशिकची सिनेमागृहे बनली छावणी : पोलीस बंदोबस्तात ‘पद्मावत’ हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 06:41 PM2018-01-25T18:41:16+5:302018-01-25T18:53:28+5:30

राजपूत समाजाकडून पद्मावती चित्रपटाला विरोध केल्याने चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रश्न न्यायालयात पोहचला. सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला.

Cemeteries of Nashik made camp: The police constable 'Padmavat' HouseFull | नाशिकची सिनेमागृहे बनली छावणी : पोलीस बंदोबस्तात ‘पद्मावत’ हाऊसफुल्ल

नाशिकची सिनेमागृहे बनली छावणी : पोलीस बंदोबस्तात ‘पद्मावत’ हाऊसफुल्ल

Next
ठळक मुद्दे पोलीस ठाणेनिहाय चित्रपत्रगृहांभोवती बंदोबस्त मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी भदक्राली पोलिसांनी आंदोलनापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.

नाशिक :पद्मावत’चा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' बघण्यासाठी नाशिककरांची पावले सिनेमागृहांच्या दिशेने वळाली खरी; मात्र भीतीच्या सावटाखालीच. सिनेमागृहांच्या प्रवेशद्वारावर येताच पोलिसांचा फौजफाटा बघून नेमके आपण चुकून पोलीस छावणीत आलो की काय, असा अनेकांचा समज झाला, त्यामुळे अनेकांनी ‘पद्मावत’ पोलीस बंदोबस्त भ्रमणध्वनीच्या कॅमे-यात टिपत सोशल मीडियावर पोस्ट केला. दिवसभर सर्व सिनेमागृहांमध्ये ‘पद्मावत’ बघण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
राजपूत समाजाकडून पद्मावती चित्रपटाला विरोध के ल्याने चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रश्न न्यायालयात पोहचला. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चित्रपट गुरुवारी (दि.२५) प्रदर्शित करण्यात आला. देशभर सदर सिनेमा प्रसारित झाला; मात्र सर्वत्र विरोधाची धार तीव्र होती. नाशिकमध्येही चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणाºया एका ‘राणा सेना’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सेनेकडून कॉलेजरोडवरील सिनेमागृह व्यवस्थापकांना चित्रपट प्रदर्शित करू नये, या मागणीचे निवेदन देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून केला जात होता. भदक्राली पोलिसांनी आंदोलनापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन भद्रकाली पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले. संध्याकाळपर्यंत सर्व शो सुरळीतपणे चालल्याचे पोलिसांनी सांगितले. परिमंडळ १ व २ मध्ये प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय चित्रपत्रगृहांभोवती बंदोबस्त पुरविण्यात आला होता.


सकाळी नऊ वाजता चित्रपटगृहांमध्ये ‘पद्मावत’चा पहिला शो प्रदर्शित झाला. नाशिकमधील सर्व मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. चित्रपटाची आॅनलाइन आगाऊ नोंदणी करत प्रेक्षकांनी ‘पद्मावत’चा आनंद लुटल्याचे सिनेमागृहांच्या व्यवस्थापकांनी बोलताना सांगितले. आगाऊ नोंदणीमुळे नोंदणी काऊंटरवर फारशी गर्दीदेखील यावेळी झाल्याचे दिसून आले नाही. नाशिकरोड, उपनगर, गंगापूर, अंबड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणा-या सिनेमागृहांभोवती संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त पुरविण्यात आला होता.

Read in English

Web Title: Cemeteries of Nashik made camp: The police constable 'Padmavat' HouseFull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.