बापरे! डोंगरीतून मुंबई पोलिसांनी तब्बल १५ कोटींचे ५ किलो हिरोईन केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 10:11 PM2021-10-06T22:11:44+5:302021-10-06T22:12:32+5:30

Drugs Busted by Mumbai Police : गुप्त माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एएनसीने दोन्ही आरोपींना दक्षिण मुंबईतील डोंगरी भागातून अटक केली आहे.

Mumbai police seize 5 kg of heroin worth Rs 15 crore | बापरे! डोंगरीतून मुंबई पोलिसांनी तब्बल १५ कोटींचे ५ किलो हिरोईन केले जप्त

बापरे! डोंगरीतून मुंबई पोलिसांनी तब्बल १५ कोटींचे ५ किलो हिरोईन केले जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपी राजस्थानमधील निवासी असून ते मुंबईत ग्राहकांना प्रतिबंधित अमली पदार्थ विक्रीसाठी आले होते.

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell ) डोंगरी परिसरातून दोघांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून तब्बल १५ कोटींचे ५ किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर ही मुंबई पोलिसांनी केलेली मोठी कारवाई आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनो सांगितलं की, आरोपी राजस्थानमधील निवासी असून ते मुंबईत ग्राहकांना प्रतिबंधित अमली पदार्थ विक्रीसाठी आले होते.

नगराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एएनसीने दोन्ही आरोपींना दक्षिण मुंबईतील डोंगरी भागातून अटक केली आहे. त्यांच्या तपासादरम्यान आरोपींकडून  तब्बल 7 किलो हेरोइड सापडली आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच क्रूझ जहाजाशी (जेथे NCB ने छापे घातले आणि अटक केली) किंवा त्याच्या समुद्रसपाटीबद्दल इतर परवानग्या संबंधित काही उल्लंघन होते की नाही याबाबत आम्ही डीजी, शिपिंग कॉर्पोरेशनला पत्र पाठवू, असे देखील नगराळे यांनी पुढे सांगितले. 

Web Title: Mumbai police seize 5 kg of heroin worth Rs 15 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.