coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या २७ हजार पार; आतापर्यंत ७८२ बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 10:44 PM2020-09-10T22:44:33+5:302020-09-10T22:48:40+5:30

गुरुवारी ४३७ नवे रूग्ण; १४ रुग्णांचा मृत्यू

coronavirus: The number of patients in the district is over 27,000 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या २७ हजार पार; आतापर्यंत ७८२ बाधितांचा मृत्यू

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या २७ हजार पार; आतापर्यंत ७८२ बाधितांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या ५८०३ रुग्णांवर सुरू उपचार आहेत २०,७०४ रूग्ण बरे झाले आहेत

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल ४३७ नव्या रुग्णांची भर पडली. तर उपचार सुरू असताना इतर जिल्ह्यातील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २७, २८९ झाली आहे. 

जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या ४३७ रुग्णांत १६४ रूग्ण ग्रामीण भागातील, ९७ रूग्ण मनपा हद्दीतील, ७३ रूग्ण सिटी एंट्री पॉइंटवरील आणि अन्य १०३ रूग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी २०,७०४ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७८२ झाली आहे. तर ५,८०३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.

उपचार सुरू असताना न्यू हनुमान नगरातील ७० वर्षीय पुरूष, जय भवानी नगर, मुकुंदवाडीतील ५० वर्षीय पुरूष, सिल्लोड येथील ४५ वर्षीय महिला, एन पाच सिडकोतील ७७ वर्षीय पुरूष, बोधवड, सिल्लोड येथील ९५ वर्षीय पुरूष, कंकावती नगर, कन्नड येथील ७० वर्षीय स्त्री, पिशोर कन्नड येथील ६५ वर्षीय पुरूष, बीड बायपास येथील ६० वर्षीय महिला, रेल्वे स्टेशन परिसरातील ६५ वर्षीय पुरूष, बीड बायपास येथील ८२ वर्षीय पुरूष, कन्नड येथील ७० वर्षीय पुरूष, सोयगावातील श्रीराम मंदिराजवळील ७४ वर्षीय पुरूष , नाथ नगरातील ७१ वर्षीय पुरूष आणि मेहकर-बुलढाणा येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात गुरुवारी मनपा हद्दीतील १४० आणि ग्रामीण भागातील ११० रुग्णांना सुटी देण्यात आली. 

ग्रामीण भागातील रूग्ण -१६४ 
शिरूडी, फुलंब्री १, एमआयडीसी, वाळूज १, कृषी महाविद्यालय, पैठण १, लासूर, वैजापूर १, देवळी, कन्नड १, अंधारी, सिल्लोड १, बजाजनगर ७, अयोध्यानगर, बजाजनगर ३, जय भवानीनगर, बजाजनगर १, एमआयडीसी कॉलनी, बजाजनगर १, वडगाव, बजाजनगर १, तुर्काबाद १, पंढरपूर ५, भगतसिंग नगर, वाळूज १, शिवराई फाटा, वाळूज १, झेंडा मैदान, वाळूज २, गणेशनगर, वाळूज १, शिवराई १, गणेश चौक, वाळूज ३, माळीवाडा, कन्नड ४, पिशोर नाका, कन्नड १, शिवनगर, कन्नड १, पिशोर, कन्नड १, तपोवन, कन्नड १, करमाड ३, एमआयडीसी पैठण १, नाथ गल्ली पैठण २, नारळा, पैठण २, रामनगर, पैठण २, नवीन कावसान, पैठण १, इंदिरानगर,पैठण १, टाकळी अंबड, पैठण २, मन्सुरी कॉलनी, गंगापूर २, लासूरस्टेशन, गंगापूर १, शिक्षक कॉलनी, गंगापूर ४, अखिलेशनगर, गंगापूर १, लासूर नाका, गंगापूर १, गंगापूर ५, जाधव गल्ली, गंगापूर ४, शिवप्रतापनगर, वैजापूर १, फुलेवाडी, वैजापूर १, डवला, वैजापूर १ नवजीवन कॉलनी, वैजापूर १, जीवनगंगा, वैजापूर ४, टाकळी सागज, वैजापूर १, सुंदर गणपती, वैजापूर १, अगरसायगाव, वैजापूर १, हिलालपूर, वैजापूर १, शिऊर, वैजापूर ३, शिवराई रोड, वैजापूर १, चंद्रपाल नगर, वैजापूर १, राजवाडा, शिऊर ३, फुलेवाडी १, कुंभेफळ, शेंद्रा १, वाळूज, गंगापूर १, मुद्देश वडगाव ३, जयसिंग नगर, गंगापूर २, सखारामपंतनगर, गंगापूर ४, शास्त्री कॉलनी, सिल्लोड १, मुंडणगाव, सिल्लोड १, टिळकनगर, सिल्लोड १, वैशाली नगर, सिल्लोड १, तहसील कार्यालय परिसर, सिल्लोड ३, घाटनांद्रा, सिल्लोड २, रांजणगाव शेणपूजी २, शेवरी १, औरंगाबाद ५, फुलंब्री १२, कन्नड ३, सिल्लोड ३, वैजापूर ९, पैठण १२, खुलताबाद १, दावरवाडी, पैठण १. 

मनपा हद्दीतील रूग्ण-९७ 
मयूर पार्क ५, मारोतीनगर ३, सिंधीनगर १, चिकलठाणा १, मिटमिटा २, रेणुकानगर २, संजय नगर, कैलास नगर २, मातोश्री नगर २, सप्तशृंगी नगर, पडेगाव १, विष्णूनगर, बालाजीनगर १, भानुदासनगर २, सिंहगड कॉलनी १, गजानन मंदिर परिसर ४, वेदांतनगर ५, उस्मानपुरा ३, जवाहर कॉलनी १, हर्सुल १, द्वारकापुरी १, सातारा परिसर ३, जय विश्वभारती कॉलनी १, शंभूमहादेव नगर २, जालाननगर २, अन्य ५, पानचक्की १, शहानूरवाडी २, पैठण गेट १, शिवाजीनगर २, रामनगर १, एसआरपीएफ ग्रुप, सातारा परिसर १, अंबिकानगर १, एन बारा स्वामी विवेकानंद नगर १, रोहिदास नगर १, एन नऊ, श्रीकृष्ण नगर १, कैलाशनगर १, रायगड नगर १, एन सहा अविष्कार कॉलनी १, जाधववाडी १, संघर्षनगर, मुकुंदवाडी १, फुले कॉलनी १, अयोध्यानगर १, मिलिट्री हॉस्पीटल ३, नाथनगर १, भगतसिंगनगर १, मोरेश्वर सो., गारखेडा २, पडेगाव १, तारांगण २, विद्यापीठ परिसर १, मनजितनगर १, एन सात सिडको १, अभूषण पार्क १, पहाडसिंगपुरा १, इंदिरानगर, गारखेडा परिसर १, बन्सीलाल नगर १, किल्लेअर्क १, एन सहा, सिडको १, भावसिंगपुरा ४, राजे संभाजी कॉलनी, हर्सुल १, सिटी चौक पोलिस स्टेशन परिसर १, उत्तरानगरी १, म्हाडा कॉलनी १ 

सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्ण -७३ 
कन्नड १, दत्त नगर १, पंढरपूर १, म्हसोबानगर २, मयूर पार्क १, विश्रांती नगर १, शिवनेरी कॉलनी १, रामनगर ४, सुलतानपूर १, चौधरी कॉलनी, चिकलठाणा १, इटखेडा ५, कांचननगर १, कांचनवाडी ३, बीड बायपास २, सातारा परिसर ३, गजानन नगर १, संघर्ष नगर १, मिटमिटा पडेगाव ५, पिसादेवी २, जाधववाडी १, होनाजीनगर १, समृद्धी महामार्ग कर्मचारी १, सिटी चौक १, एन तेरा, गणेश नगर १, हर्सुल १, रोशन गेट १, पुंडलिक नगर १, भराडी, सिल्लोड १, गेवराई कुबेर १, सावंगी १, चिंचोली लिंबाजी (1), कायगाव १, वाळूज १, पवन नगर, एमआयडीसी १, गारखेडा परिसर १, बजाजनगर ५, लाडगाव सावंगी २, बाळापूर ३, भालगाव १, न्यू हनुमान नगर ४, निपाणी १, उत्तरानगरी १, खामगाव १, चिकलठाणा १, पैठण रोड १.

Web Title: coronavirus: The number of patients in the district is over 27,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.