2019मध्ये प्रेक्षकांसाठी 'या' वेबसीरिजच्या सिक्वेल्सची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 04:26 PM2019-01-02T16:26:54+5:302019-01-02T16:36:51+5:30

सेक्रेड गेम्स 2 : नेटफ्लिक्सवर 2018मध्ये रिलीज झालेली आणि पाहता क्षणी लोकांच्या मनाचा ठाव घेणारी वेब सीरिज म्हणजे सेक्रेड गेम्स. ही वेबसीरीज इतकी प्रसिद्ध झाली होती की, यातील संवादही चाहत्यांच्या तोंडी रूजले होते. सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टार कास्टमध्ये असलेल्या वेबसीरिजमधून मुंबईतील अंडरवर्ल्डची झलक दाखवण्यात आली होती. दरम्यान काही कारणांमुळे या वेबसिरिजचा दुसरा सीझन येणार नाही अशी माहीती काही दिवसांपूर्वी निर्मात्यांकडून देण्यात आली होती. परंतु, स्वतः नेटफ्लिक्सने सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे नववर्षात सेक्रेड गेम्स चा दूसरा पार्ट प्रदर्शित केला जाणार असून प्रेक्षकांचा गायतोंडे हटके संवादाची शिदोरी घेऊन मनोरंजनासाठी येणार आहे.

मिर्झापूर 2 : 2018मधील सर्वात मोठा क्राइम ड्रामा अशी ख्याती मिळवलेल्या अॅमेझॉन प्राइमवरील 'मिर्झापूर' या वेबसीरिजची चर्चा संपूर्ण देशभरात होत आहे. कालीन भैय्या आणि गुड्डू-बबलूच्या या मसालेदार गोष्टीने संपूर्ण इंटरनेट जगतात धुमाकूळ घातला होता. अॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आलेल्या या वेबसीरिजला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. संस्पेंन्सच्या या फिवरचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. स्वतः मिर्झापूरच्या या मेकर्सनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. याचा सिक्वल लवकरच येणार असून त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

लव, लस्ट अॅन्ड कंन्फयूजन 2 : यंगस्टर्सचं कंन्फयूजनने व्यापलेल्या आयुष्यात, थोडंसं लव्ह आहे, थोडसं लस्टही आहे. याचीच गोष्ट सांगणारी ही वेबसीरिज लोकांनी चक्क डोक्यावर घेतली. व्हीआईयू वर रिलिज करण्यात आलेल्या या ओरिजनल वेब सीरीजचा दुसरा पार्ट याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरिजमध्ये कोणत्याही लव्ह रिलेशनला एका महिलेच्या नजरेतून सांगण्यात आले आहे. कदाचित याच कारणामुळे ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

ब्रीथ 2 : अॅमेझॉन वर काही दिवसांपूर्वीच रिलिज करण्यात आलेली ब्रीथ सीरिजही लोकांना प्रच्ंड आवडलेली. आर. माधवन लिड रोलमध्ये असलेल्या या सीरिजमध्ये गोष्टींचे ग्रे शेड्स लोकांसमोर मांडले होते. असं सांगितलं जात आहे की, 2019मध्ये येणाऱ्या नव्या सीजनमध्ये अभिषेत बच्चन दिसणार असून सध्या शुटींग सुरू आहे.

गंदी बात 2 : एलटी बालाजीच्या या सीरिजला अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने रिव्यूज दिले. काहींनी ही स्टोरी फेक असल्याचे सांगितले तर काहींनी ग्राउंड लेवलवर या गोष्टी होतात असं म्हणत दुजोरा दिला. रिव्ह्यू कसाही असला तरिही लोकांमध्ये या वेबसीरिजबाबत चर्चा होत आहेत. या सीरिजला मिळालेला चाहत्यांचा रिस्पॉन्स पाहून याचा दुसरा पार्ट तयार करण्याची तयारी सुरू आहे. 2019मध्ये 'गंदी बात'चा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डॅमेज 2 : एका लेडी सिरिअल किलरवर आधारित असलेल्या या वेबसिरीजने लोकांना हादरवून सोडले होते. याची कथा मिस्ट्री आणि सस्पेंसयुक्त असून याचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असं सांगितलं जात आहे की, नवीन सीरिजसाठी एखादा नव्या चेहऱ्याचा विचार केला जाऊ शकतो.