या अभिनेत्रीच्या मुलाचे फोटो पाहून विसराल तैमुरला, आहे खूपच क्यूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 04:52 PM2020-04-03T16:52:18+5:302020-04-03T17:09:20+5:30

अभिनेत्री एमी जॅक्सनन 23 सप्टेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला.

लग्नापूर्वी एमी आई झाली असून लवकरच ती तिचा प्रियकर जॉर्ज पानायिटूसोबत लग्न करणार आहे.

एंड्रिआज असे एमीच्या मुलाचे नाव असून तो खूपच क्यूट आहे.

जॉर्ज व एमी 2015 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2018 मध्ये दोघांनी आपले रिलेशन जगजाहिर केले होते.

जॉर्ज आणि एमी यांनी 2018 मध्ये साखरपुडा केला. तेव्हाच एमी दोन महिन्यांची प्रेग्नंट होती.

जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लब आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.

एमी जॅक्सने ‘एक दिवाना था’ या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. तसेच रजनीकांतच्या ‘2.0’ आणि अक्षय कुमारच्या‘सिंग इज ब्लिंग’ मध्ये तिने काम केले होते.

एमीच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिच्या मुलाचे अनेक फोटो पाहायला मिळतात.