कायगाव, भेंडाळ्यात रुग्णांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:06 AM2021-04-23T04:06:39+5:302021-04-23T04:06:39+5:30

उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्यविभाग, आदींना याबाबत कळविले आहे. प्रशासनाने आदेश काढल्यानंतर गुरुवारी कायगावात बैठक ...

The number of patients increased in Kayagaon, Bhendal | कायगाव, भेंडाळ्यात रुग्णांची संख्या वाढली

कायगाव, भेंडाळ्यात रुग्णांची संख्या वाढली

googlenewsNext

उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्यविभाग, आदींना याबाबत कळविले आहे.

प्रशासनाने आदेश काढल्यानंतर गुरुवारी कायगावात बैठक संपन्न झाली. यावेळी पं. स. सदस्य सुमित मुंदडा, सरपंच हरिश्चंद्र माळी, उपसरपंच अंजुम शेख, ग्रामपंचायत सदस्य मारुती सोनवणे, बाळू उचित, राजू भडंगे, पोलीस पाटील संदीप चित्ते, आदी हजर होते. सायंकाळी गावाच्या प्रवेशद्वार असणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या.

अत्यावश्यक बाबी वगळता आता नागरिकांना गावात फिरण्यास सक्तीने मनाई करण्यात आली आहे. यासाठी पोलीस विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गावातील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचणी करणे, आरोग्य तपासणी करणे, संसर्ग पसरणार नाही याची दक्षता घेणे, लसीकरणावर भर देणे, आदी गोष्टींवर भर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

फोटो :

कायगावात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने गावातील रस्ते बंद करण्यात आले आहे.

220421\tarekh ahemad usuf shaikh_img-20210422-wa0018_1.jpg

कायगावात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने गावातील रस्ते बंद करण्यात आले आहे.

Web Title: The number of patients increased in Kayagaon, Bhendal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.