लग्नाआधी 'हे' महत्त्वाचे काम पूर्ण करणार प्रियांका चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 06:00 AM2018-11-19T06:00:00+5:302018-11-19T06:00:00+5:30

दीपवीरच्या लग्नानंतर सगळ्यांना वेध लागलेत तर देसीगर्ल प्रियांका चोप्राच्या लग्नाचे. प्रियांका आपला बॉयफ्रेंड निक जोनास सोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

Before the wedding, Priyanka Chopra will complete the important work | लग्नाआधी 'हे' महत्त्वाचे काम पूर्ण करणार प्रियांका चोप्रा

लग्नाआधी 'हे' महत्त्वाचे काम पूर्ण करणार प्रियांका चोप्रा

googlenewsNext
ठळक मुद्दे एकीकडे प्रियांकाच्या लग्नाच्या तयारी सुरु असतानाच ती मात्र तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.या सिनेमाचे दिग्दर्शन शोनाली बोस करतेय अशी माहिती आहे

दीपवीरच्या लग्नानंतर सगळ्यांना वेध लागलेत तर देसीगर्ल प्रियांका चोप्राच्या लग्नाचे. प्रियांका आपला बॉयफ्रेंड निक जोनास सोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. एकीकडे प्रियांकाच्या लग्नाच्या तयारी सुरु असतानाच ती मात्र तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. प्रियांका 'द स्काय इज पिंक' सिनेमाचं शूटिंग आटपण्याच्या गडबडीत आहे.


या सिनेमाच्या सेटवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये जामा मशीद दिसतेय. या सिनेमाचे दिग्दर्शन शोनाली बोस करतेय अशी माहिती आहे.

निकने संगीत सेरेमनीसाठी खास प्लान तयार केला आहे. येत्या ३० नोव्हेंबरला हा संगीतसोहळा होणार आहे. या संगीत सेरेमनीत निक आणि पीसी दोघेही परफॉर्म करणार आहे. निक तर खास आपल्या ट्रूपसोबत परफॉर्म करणार आहे. त्याचा हा परफॉर्मन्स ४५ मिनिटांचा असेल.निक आणि प्रियांका एकदा नाही तर दोनदा लग्न करणार, असेही करतेय.  यात तो प्रियांकासाठी लव्ह सॉन्ग गाताना दिसेल. अमेरिकन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत जोधपूरमध्ये हा विवाह सोहळा हेणार आहे. अर्थात  याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण हे लग्न शाही होणार, यात शंका नाही.  

Web Title: Before the wedding, Priyanka Chopra will complete the important work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.