गंभीर ! जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधितांचा मृत्यू, ११७ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 06:08 PM2022-01-27T18:08:46+5:302022-01-27T18:14:24+5:30

जिल्ह्यात आज गुरुवारी ११७ बाधितांची भर पडली असतानाच २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर आता जिल्ह्यात १६७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

two covid-19 patients death and 117 new cases registered in gondia district on 27 jan | गंभीर ! जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधितांचा मृत्यू, ११७ रुग्णांची भर

गंभीर ! जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधितांचा मृत्यू, ११७ रुग्णांची भर

Next
ठळक मुद्दे११७ बाधितांची पडली भर२२८ रुग्णांना दिली सुटी

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना आपले पाय पसरत असून आता परिस्थिती अधिकाधिक गंभीर होताना दिसत आहे. एकीकडे जेथे रुग्णसंख्या वाढत चालली आहे, तेथेच दुसरीकडे मृतांचा आकडाही वाढत असल्याने दहशत वाढू लागली आहे. गुरुवारी (दि. २७) जिल्ह्यात ११७ बाधितांची भर पडली असतानाच २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर आता जिल्ह्यात १६७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्ह्यात सध्या दररोज २०० च्यावर बाधितांची नोंद घेतली जात असून यामुळे ॲक्टिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात बाधितांची संख्या १६७१ झाली असून गुरुवारी (दि. २७) जिल्ह्यात ११७ नवीन बाधितांची भर पडली आहे. तर २२८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रुग्णसंख्या वाढत असतानाच मृतांचा आकडा वाढू लागला असून ही बाब धोक्याची आहे. यानंतर जिल्ह्यात आता कोरोना आपले पाय झपाट्याने पसरताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, शहरासह ग्रामीण भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाधितांची संख्या २०० वर गेली असून हे दोन तालुके हॉटस्पॉट बनताना दिसत आहे.

बुधवारी पडली ३६२ बाधितांची भर

जिल्ह्यात बुधवारी तब्बल ३६२ बाधितांची भर पडली आहे. तर १५८ बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात यापूर्वीही ३०० बाधितांची भर पडली असून ही आकडेवारी बघता जिल्हावासीयांनी आता अधिकाधिक जबाबदारीने वागण्याची गरज दिसत आहे.

Web Title: two covid-19 patients death and 117 new cases registered in gondia district on 27 jan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.