ही विचारधारेची लढाई, तडजोड नाही; संघ, भाजपवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:06 AM2021-09-16T09:06:36+5:302021-09-16T09:07:43+5:30

महिला काँग्रेसच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

rahul Gandhi attack on Sangh BJP This is an ideological battle not a compromise pdc | ही विचारधारेची लढाई, तडजोड नाही; संघ, भाजपवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

ही विचारधारेची लढाई, तडजोड नाही; संघ, भाजपवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Next

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : संघ आणि भाजपच्या विचारधारेशी काँग्रेस कधीही तडजोड करु शकत नाही. यामुळेच काँग्रेस आणि भाजपत विचारधारेचा संघर्ष आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 

महिला काँग्रेसच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिला शक्तीचा उल्लेख करुन ते म्हणाले की, लक्ष्मीची शक्ती - रोजगार, दुर्गाची शक्ती - निर्भयता, सरस्वतीची शक्ती - ज्ञान. मात्र, भाजप या सर्व शक्ती हिसकावून घेत आहे. परंतु, आमचा हा संकल्प आहे की, या सर्व शक्ती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लढाई करु. सावरकर आणि गोडसे यांचा उल्लेख करुन राहुल गांधी म्हणाले की, याच विचारसरणीने महात्मा गांधीजींचा जीव घेतला. संघ आणि भाजप हे नकली हिंदू असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

महिला भयभीत

राहुल गांधी म्हणाले की, आज मीडियाही भयभीत आहे. वास्तव हे आहे की, मोदी यांच्याकडे शक्ती नाही. ते भीतीने कापतात. मोदी यांचे पूर्ण जीवन खोटारडे आहे. ते नेहमीच भिऊन पळालेले आहेत. भाजपच्या काळात महिला भयभीत आहेत. संघ आणि भाजपने कोणत्याही महिलेला पंतप्रधान होऊ दिले नाही.

Web Title: rahul Gandhi attack on Sangh BJP This is an ideological battle not a compromise pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.