गंगापूर मार्गावर 'बर्निंग ट्रकचा' थरार; कापसाच्या गाठीसह ट्रक खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 07:16 PM2021-10-09T19:16:48+5:302021-10-09T19:17:23+5:30

पलटी झालेला ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पोलला जाऊन धडकल्याने सॉर्ट सर्किट होऊन आग लागली

Thrill of 'burning truck' on Gangapur road; burn the truck with a cotton swab | गंगापूर मार्गावर 'बर्निंग ट्रकचा' थरार; कापसाच्या गाठीसह ट्रक खाक

गंगापूर मार्गावर 'बर्निंग ट्रकचा' थरार; कापसाच्या गाठीसह ट्रक खाक

googlenewsNext
ठळक मुद्देआगीत ट्रक व कापसाच्या गाठी मिळून अंदाजे १२ लखाचे नुकसान झाले

गंगापूर: नाशिक येथून गंगापूर मार्गे औरंगाबाद येथे कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकने साखर फाट्याजवळ एका मंगल कार्यालयासमोर पेट घेतला. यात कापसाच्या गाठीसह ट्रक खाक झाला. ही घटना शनिवार (९) रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. 

नाशिक येथील उत्तम कॉटन मिल या कंपनीच्या कापसाच्या गाठी औरंगाबाद येथील लक्की गादीघर येथे घेऊन जाणाऱ्या ट्रकचे (एम एच १५ ईजी ६३१८) पुढील टायर अचानक पंक्चर झाल्याने ट्रक पलटी झाला व पलटी झालेला ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पोलला जाऊन धडकल्याने सॉर्ट सर्किट होऊन ट्रकने पेट घेतला, कापसाच्या गाठीसह ट्रक आगीत जळून खाक झाला. यावेळी परिसरात आगीचे लोळ दिसून येत होते तर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर धूर देखील झाल्याने काहीकाळ वाहतूक प्रभावित झाली होती. औरंगाबाद येथील अग्निशमन दलाच्या गाडीने आग विझवण्यात आली. आगीत ट्रक व कापसाच्या गाठी मिळून अंदाजे १२ लखाचे नुकसान झाले आहे. चालक सागर जाधव रा.बोरवाडी गदाना ता.खुलताबाद यांनी प्रसंगावधान राखत वेळीच उडी मारल्याने ते बचावले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, सदरील घटनेची शनिवार दुपारपर्यंत उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती

Web Title: Thrill of 'burning truck' on Gangapur road; burn the truck with a cotton swab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.