Pankaja Munde : पंकजा मुंडे अचानकच सिटी बसमधून प्रवास करतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 09:50 PM2021-11-02T21:50:15+5:302021-11-02T21:52:02+5:30

या सेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. या सेवेबद्दल पंकजाताईंनी महापौरांचे विशेष कौतुक केले.

Pankaja Munde : When Pankaja Munde suddenly travels by city bus in nashik city bus | Pankaja Munde : पंकजा मुंडे अचानकच सिटी बसमधून प्रवास करतात तेव्हा...

Pankaja Munde : पंकजा मुंडे अचानकच सिटी बसमधून प्रवास करतात तेव्हा...

googlenewsNext
ठळक मुद्देपंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

नाशिक - भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज सकाळी अचानकपणे शहरातील सिटी बसमधून प्रवास करत सर्वानाच आश्चर्यचकित केले. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: तिकीट काढून हा प्रवास केला. त्यामुळे, त्यांच्यासमवेत असणारे आमदार, महापौर आणि कार्यकर्तेही अवाक् झाले. तर, सिटी बसमधील तिकीट कंडक्टरलाही पंकजा मुंडेच्या या साधेपणाचे आश्चर्य वाटले. 

पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी माऊली नगरातील एका गृह प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम संपून त्या बाहेर आल्या आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या सिटी बसमध्ये बसल्या, या प्रसंगाने कार्यकर्ते व प्रवाशी आश्चर्यचकित झाले, त्यांचेसमवेत आ. जयकुमार रावल, आ. सीमाताई हिरे, महापौर सतीश कुलकर्णी हेही हजर होते. बसमधील वाहकांकडून तिकिट काढून त्यांनी सावरकर नगर ते अशोकनगर असा प्रवास केला. नाशिकमधील ही बससेवा अल्पावधीतच अतिशय उपयुक्त ठरली असून महापालिकेने सुमारे 250 बस यासाठी रस्त्यावर उतरवल्या आहेत. 


दरम्यान, या सेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. या सेवेबद्दल पंकजाताईंनी महापौरांचे विशेष कौतुक केले.
 

Web Title: Pankaja Munde : When Pankaja Munde suddenly travels by city bus in nashik city bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.