गंगामाई साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाला भीषण आग; दोघे जखमी 

By साहेबराव नरसाळे | Published: February 25, 2023 09:50 PM2023-02-25T21:50:34+5:302023-02-25T21:51:53+5:30

आगीच्या ज्वाळांचे उग्ररुप इतके भयानक होते की, आगीचे लोळ आसपासच्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील गावामध्ये दिसून येत आहेत. 

distillery plant of gangamai sugar factory caught fire in shevgaon ahmednagar both injured | गंगामाई साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाला भीषण आग; दोघे जखमी 

गंगामाई साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाला भीषण आग; दोघे जखमी 

googlenewsNext

शेवगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील बाभाळगाव शिवारात असलेल्या गंगामाई साखर कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती डिस्टिलरी प्रकल्पाला शनिवारी सायंकाळच्या सुमारास मोठी आग लागली आहे. आगीच्या ज्वाळांचे उग्ररुप इतके भयानक होते की, आगीचे लोळ आसपासच्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील गावामध्ये दिसून येत आहेत. 

आग नियंत्रणात आणण्याच्या पलीकडे गेल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे कळते आहे. आगीचे निश्चित कारण, कारखान्यात किती कर्मचारी अडकले आहेत, तसेच जखमी व वित्तहानी बाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान आगीची माहिती मिळताच आसपासच्या तालुक्यातील साखर कारखाने, विविध संस्थांचे अग्निशमन दलाचे पथक बंबासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून विविध भागातील रुग्णवाहिनीकांना पाचारण करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना वैद्यकिय अधिकारी डॉ. रामेश्वर काटे यांनी दिल्या आहे. 

पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे वाढते प्रमाण, दरम्यान टाक्यांचे होणारे स्फोट लक्षात घेऊन, पोलिसांनी कारखाना स्थळाच्या परिसरातील आसपासच्या तीन ते चार किलोमीटर अंतरातील गावातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या आहेत. बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने काही रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे आठ ते दहा अग्निशमन दलाच्या पथकाकडून यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: distillery plant of gangamai sugar factory caught fire in shevgaon ahmednagar both injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग