लोकमत आणि व्हिस्पर चॉइसच्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:47 AM2017-11-20T00:47:37+5:302017-11-20T00:47:42+5:30

लोकमत आणि व्हिस्पर चॉइस यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीसाठी असणारा ‘घे उंच भरारी’ हा अभिनव उपक्रम शनिवारी सायंकाळी लोकमत हॉल येथे राबविण्यात आला.

 Massive response to Lokmat and Whisper Choice's efforts | लोकमत आणि व्हिस्पर चॉइसच्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद

लोकमत आणि व्हिस्पर चॉइसच्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद

googlenewsNext

औरंगाबाद : लोकमत आणि व्हिस्पर चॉइस यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीसाठी असणारा ‘घे उंच भरारी’ हा अभिनव उपक्रम शनिवारी सायंकाळी लोकमत हॉल येथे राबविण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांचा आणि तरुणींचा उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे जणू प्रत्येक मुलीला आपल्या आकांक्षांकडे उंच भरारी घेण्याचे पाठबळच मिळाले.
व्हिस्परच्या प्रतिनिधी स्मिता विश्वंभर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चारुशीला देशमुख, सेंट लॉरेन्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना सोनटक्के यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. मासिक पाळीमध्ये घेतली जाणारी काळजी आणि स्वच्छता याबद्दल आजही आई आणि मुलींमध्ये मोकळेपणाने संवाद साधला जात नाही. ‘घे उंच भरारी’ या कार्यक्रमामुळे या नाजूक विषयावर संवाद साधण्यासाठी प्रत्येक आई आणि मुलीला एक मंच मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, आजच्या स्पर्धेच्या काळात मासिक पाळीमुळे मुलींची शाळा बुडू नये, यासाठी व्हिस्पर चॉइस वापरणे किती महत्त्वाचे आहे, हे एव्हीद्वारे दाखविण्यात आले. मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख यांनी मासिक पाळीसंदर्भात असणाºया सर्व गैरसमजुती दूर करून यामागचे शास्त्रीय कारण समजावून सांगितले. याकाळात घ्यावयाची काळजी, आहार, व्यायाम, दिनचर्या, आरोग्याची स्वच्छता याविषयी सविस्तर माहिती दिली. एक शिक्षिका म्हणून या काळात मुलींना कसे विश्वासात घ्यावे, त्यांच्याशी संवाद कसा साधावा, याविषयी अर्चना सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले.
या विषयाबाबत अनेक मुलींच्या मनात भीती आणि अज्ञान आहे. या नाजूक काळात योग्य माहिती नसल्यामुळे, डाग लागण्याच्या भीतीमुळे मुली शाळा चुकवतात. त्यांच्या मनावर सतत दडपण असते. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. या उपक्रमामुळे या सगळ्या समस्यांना तोड मिळणार आहे. महिला व मुलींचा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. अश्विनी दाशरथे यांनी संचालन केले. धनेश्वरी नर्सिंग कॉलेज, राजेश पाटील डिफेन्स अकॅडमी, बजाज हॉस्पिटल नर्सिंग कॉलेज येथील विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
मासिक पाळीदरम्यान पॅड कसे वापरावेत, याचे प्रात्यक्षिक झाले. आलेल्या महिलांना हा उपक्रम खूपच मार्गदर्शक वाटला. पॅड वापरल्यामुळे आपल्या मुलींची शाळा चुकणार नाही व तिच्या स्वप्नांना भरारी मिळण्यास नक्कीच मदत होईल, यावर सगळ्यांचे एकमत झाले.

Web Title:  Massive response to Lokmat and Whisper Choice's efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.