.... अन्यथा दहा दिवसांत औरंगाबाद शहर चकाचक करून दाखवले असते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:22 AM2018-10-11T00:22:30+5:302018-10-11T00:22:58+5:30

दि. ११ आॅक्टोबरपासून शहरातील सर्व कचरा उचलायला सुरुवात करून पुढील दहा दिवसांत संपूर्ण शहर चकाचक करण्याची योजना मी आखली होती.

.... otherwise the Aurangabad town would have been brushed in ten days! | .... अन्यथा दहा दिवसांत औरंगाबाद शहर चकाचक करून दाखवले असते!

.... अन्यथा दहा दिवसांत औरंगाबाद शहर चकाचक करून दाखवले असते!

googlenewsNext
ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कचरा उचलण्यास तूर्त स्थगिती

औरंगाबाद : दि. ११ आॅक्टोबरपासून शहरातील सर्व कचरा उचलायला सुरुवात करून पुढील दहा दिवसांत संपूर्ण शहर चकाचक करण्याची योजना मी आखली होती. यासाठी शहरातील झोनवार यंत्रणा तयार ठेवली होती; परंतु कन्नड येथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा कचरा पिशोर येथे आणून टाकण्यास विरोध केला. यात मी हीरो होईल व श्रेय मला मिळेल, हा द्वेष अधिक दिसतो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील कचरा उचलण्यास मी तूर्त स्थगिती देत आहे, असे बुधवारी येथे कन्नडचे आमदार व शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केले.

महापालिका स्वत: कचरा उचलण्यास असमर्थ ठरली आहे. मी कचरा उचलण्याचे नियोजन करण्यास तयार आहे किंबहुना माझ्याकडे हे नियोजन तयार आहे; परंतु मला हे काम करू दिले जात नाही. बरे असेही नाही की, मध्येच उठून मी हे काम करायला मागतोय. एक प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. पिशोर या गावी लोकवस्तीपासून ६ कि. मी. दूर असलेल्या एका निर्मनुष्य ठिकाणी कचरा आणून टाकण्याचे आवाहन केले होते, तसेच महिन्याच्या आत त्यांना तसे शक्य न झाल्यास मला स्वखर्चाने कचरा उचलू देण्यासाठी मनपाचा ठराव करून परवानगी देण्यासंदर्भात विनंती केली होती; मात्र या माझ्या उपक्रमास शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस यांनी आंदोलन करून पुन्हा विरोध केला आहे, तसेच मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक हे मला अजिबात प्रतिसाद देत नाहीत. माझा फोनसुद्धा उचलत नाहीत. ८ आॅक्टोबर रोजी सविस्तर पत्र पाठवून मी त्यांना कचरा उचलण्याची परवानगी मागितली होती; पण त्यावर काहीही निर्णय झालेला नाही, अशी माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली.

त्यांनी आणखी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादचा काही कचरा नेऊन त्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. त्यावेळेला औरंगाबादच्या कचऱ्याने कोणाच्याही आरोग्याला इजा न पोहोचता शेतक-यांना त्यातून खत निर्माण होते, हे मी सिद्ध करून दाखवलेले आहे. असे असताना मी जर औरंगाबाद शहर दहा दिवसांत कचरामुक्त केले, तर मनपाची नाचक्की होईल म्हणून मुद्दाम राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन सर्व पक्ष आज मला पुन्हा कचरा नेण्यासाठी विरोध करीत आहेत. एक तर स्वत: काही करायचे नाही आणि जो करतो त्यालाही करू द्यायचे नाही, असा उद्दामपणा हे लोक करीत आहेत. एकीकडे राज्य व केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी धडपड करा, असे सांगते, तर दुसरीकडे त्या सरकारमध्ये सामील असलेले प्रमुख पक्ष म्हणजेच शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते त्याला विरोध करतात, हे खरेच दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

Web Title: .... otherwise the Aurangabad town would have been brushed in ten days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.