Hotness Alert! सलमान खानच्या या अभिनेत्रीच्या सेक्सी अदा पाहून उडेल तुमची झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:06 PM2020-03-04T16:06:35+5:302020-03-04T16:07:31+5:30

या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे

Hotness Alert! Salman Khan's actress is too Sexy Tjl | Hotness Alert! सलमान खानच्या या अभिनेत्रीच्या सेक्सी अदा पाहून उडेल तुमची झोप

Hotness Alert! सलमान खानच्या या अभिनेत्रीच्या सेक्सी अदा पाहून उडेल तुमची झोप

googlenewsNext


ब्राझिलीयन मॉडेल व डान्सर लेरिसा बाँजी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे.ती सलमान खानच्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करणार असल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय ती गायक गुरू रंधावा याच्यासोबत सुरमा सुरमा गाण्यात झळकली. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 

लेरिसा बाँजी फिटनेस फ्रिक असून ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. तसेच तिने सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केले आहेत. 
 


सुबह होने ना दे या गाण्यापासून लॅरिसा तिच्या किलर डान्स मूव्हजसाठी ओळखली जाते. बी टाऊनमध्ये टायगर श्रॉफ आणि सुरज पांचोलीसोबतही एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. तिने बॉलिवूडमधील करियरची सुरूवात गो गोवा गॉन सिनेमातून केली आहे. या चित्रपटात तिने सहायक कलाकाराची भूमिका केली होती. या चित्रपटात सैफ अली खान, कुणाल खेमू व वीर दास मुख्य भूमिकेत होते.


अलीकडेच सलमान खानसमवेत लॅरिसाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा हा फोटो तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत दिलेली हिंट आहे. मात्र लेरिसा कोणत्या प्रोजेक्टमध्ये सलमान खानसोबत दिसणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.


सलमानचा आगामी चित्रपट 'कभी ईद कभी दिवाली'मध्ये पूजा हेगडेची वर्णी लागल्याचे वृत्त नुकतेच समोर आले. पूजा या चित्रपटात सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.


'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात पूजा हेगडे सलमान खानच्या प्रेयसीची भूमिका करताना दिसणार आहे. पूजाबद्दल सांगताना निर्माता व लेखक साजिद नाडियादवाला म्हणाला की, हाऊसफुल ४'मध्ये पूजासोबत काम केल्यानंतर, आम्हाला हे जाणवले की ती या चित्रपटासाठी एकदम परफेक्ट आहे आणि सलमानसोबत तिची जोडी चांगली वाटेल. या कथेत नावीण्य आणेल.

Web Title: Hotness Alert! Salman Khan's actress is too Sexy Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.