श्रीदेवीच्या निधनाच्या बरोबर काही तासांपूर्वी बिग बींनी केली होती अशी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 04:21 PM2020-02-24T16:21:15+5:302020-02-24T16:26:30+5:30

बिग बी आणि श्रीदेवी यांचा अभिनय असलेला खुदा-गवाह हा सिनेमा प्रचंड गाजला होता. बिग बींचे श्रीदेवी यांच्याशी चांगले संबंध होते.

Just Before Sridevi's Death Was Announced, Amitabh Bachchan Tweeted This | श्रीदेवीच्या निधनाच्या बरोबर काही तासांपूर्वी बिग बींनी केली होती अशी पोस्ट

श्रीदेवीच्या निधनाच्या बरोबर काही तासांपूर्वी बिग बींनी केली होती अशी पोस्ट

googlenewsNext

दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बॉलिवूडची पहिली फिमेल सुपरस्टार श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला होता. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवींचे निधन झाले. अभिनेत्री श्रीदेवीच्या अकाली एक्झिटने सारेच हळहळले होते.  दुबईत ‘हवाहवाई’ श्रीदेवी यांचं निधन झाल्याची बातमी आली अन् अवघं बॉलीवुड शोकसागरात बुडालं. मात्र त्याचवेळी महानायक अभिनेता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टनेही सा-यांचे लक्ष वेधले. ती पोस्ट वाचून कुणालाही वाटेल की श्रीदेवी यांच्या निधनाचा बिग बींना जणू काही कुणकुणच लागली होती. श्रीदेवीच्या निधनाच्या बरोबर काही तासांपूर्वी बिग बींनी ही पोस्ट केली होती. 


‘न जानें क्यों अजीबसी घबराहट हो रही हैं’ अशी पोस्ट बिग बींनी केली आहे. अमिताभ यांनी ही पोस्ट का केली, त्यांना कळलं होतं का काही अशा विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. बिग बींना श्रीदेवींच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना दिली का अशाही चर्चा झाल्या.


बिग बी आणि श्रीदेवी यांचा अभिनय असलेला खुदा-गवाह हा सिनेमा प्रचंड गाजला होता. बिग बींचे श्रीदेवी यांच्याशी चांगले संबंध होते. एक चांगली मैत्रीण असल्यानेच कदाचित बिग बींना ही कुणकुण लागली असावी. श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. मात्र दुबईत पुतण्याच्या लग्नसोहळ्यासाठी गेले असताना श्रीदेवी यांनी आकस्मिक जगाचा निरोप घेतला.

Web Title: Just Before Sridevi's Death Was Announced, Amitabh Bachchan Tweeted This

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.