कर्करोगाच्या वेदनेवर ‘मायेची फुंकर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:11 AM2018-10-16T00:11:51+5:302018-10-16T00:12:07+5:30

औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्क रोग संस्थेतील रुग्णांना सोमवारी ‘मायेची फुंकर’मिळाली. अभिनेता सुमित राघवन, संदीप पाठक, ...

'Heartburn' on the pain of cancer | कर्करोगाच्या वेदनेवर ‘मायेची फुंकर’

कर्करोगाच्या वेदनेवर ‘मायेची फुंकर’

googlenewsNext
ठळक मुद्देआनंदी जगण्याचे बळ : अभिनेता सुमित राघवन, संदीप पाठक, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी साधला संवाद

औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्क रोग संस्थेतील रुग्णांना सोमवारी ‘मायेची फुंकर’मिळाली. अभिनेता सुमित राघवन, संदीप पाठक, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी रुग्णांशी आपुलकीने संवाद साधून या आजाराच्या वेदना सहन करणाऱ्या रुग्णांना दिलासा देऊन आयुष्य आनंदात जगण्याचे बळ दिले.
जागतिक होस्पाईस व पॅलेटिव्ह के अर दिनानिमित्त ‘मायेची फुंकर’या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कलावंतांनी कर्करोग रुग्णालयास भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. संगीता पाटील, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. अर्चना राठोड, डॉ. अनघा वरूडकर, डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. ऋषिकेश खाडिलकर, संदीप भंडागे आदींची उपस्थिती होती. पत्रकारांशी बोलताना संदीप पाठक म्हणाले, वडिलांना कर्करोग झालेला होता. कर्करोगामुळे होणारी मृत्यूशी झुंज ही घरातच पाहिली आहे. मला लोकांना हसवायला आवडते. हसणे हे औषधच आहे.
डॉ. येळीकर म्हणाल्या, जागतिक होस्पाईसच्या संकेतस्थळावर नोंद झाली असून, आता कर्करोग रुग्णालयास मराठवाड्यातील टाटा हॉस्पिटल बनवायचे आहे. डॉ. अरविंद गायकवाड म्हणाले, कर्करोग होऊच नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) महात्मा गांधी सभागृहात दुपारी ‘मायेची फुंकर’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. इम्तियाज जलील, आ. सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती. गायन आणि उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून रुग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांना कर्करोगी दोन हात करीत जगण्याची प्रेरणा दिली.
टॉन्सिलची शस्त्रक्रिया घाटीत
चिन्मयी सुमित म्हणाल्या, कर्करोग रुग्णालयामुळे मराठवाड्याचे नाव अभिमानाने घेतले जात आहे. माझ्या टॉन्सिलची शस्त्रक्रिया घाटीत झालेली आहे. याठिकाणी जेवढी उत्तम सेवा मिळते, तेवढी कुठेही मिळत नाही.
बालकाला पाहून सुन्न
कर्करोग रुग्णालयात उपचार घेणाºया बालकाला पाहून तिघे अभिनेते क्षणभर स्तब्ध झाले. या बालकाला पाहून सगळं सुन्न झाल्यासारखं वाटले. हे थांबविण्यासाठी काय करता येईल, हाच विचार मनात आल्याचे सुमित राघवन म्हणाले.

Web Title: 'Heartburn' on the pain of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.