कुठे आहे ‘नदिया के पार’ची चुलबुली ‘गुंजा’? जाणून घ्यायचेयं, तर नक्की वाचा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 04:51 AM2018-04-19T04:51:52+5:302018-04-19T10:21:52+5:30

‘नदिया के पार’ हा बॉलिवूडचा गाजलेला सिनेमा कोण बरे विसरू शकेल? हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३८ वर्षे झालीत, पण ...

Where is the river of 'Nadiya Paro', 'Gunja'? If you want to know, then definitely read !! | कुठे आहे ‘नदिया के पार’ची चुलबुली ‘गुंजा’? जाणून घ्यायचेयं, तर नक्की वाचा!!

कुठे आहे ‘नदिया के पार’ची चुलबुली ‘गुंजा’? जाणून घ्यायचेयं, तर नक्की वाचा!!

googlenewsNext
दिया के पार’ हा बॉलिवूडचा गाजलेला सिनेमा कोण बरे विसरू शकेल? हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३८ वर्षे झालीत, पण आजही तो बॉलिवूड प्रेमींच्या मनात जिवंत आहे. विशेषत: या चित्रपटाची गाणी आणि स्टारकास्ट तर चाहते कधीच विसरू शकत नाहीत. खास करून अभिनेत्री साधना सिंह हिने साकारलेली ‘गुंजा’ आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. साधनाने साकारलेल्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. ही ‘गुंजा’ प्रत्येकाच्या मनात घर करून बसली होती. पण इतक्या वर्षांनंतर ही ‘गुंजा’ कुठे आहे, तुम्हाला माहितीये? नसेल तर आम्ही ‘गुंजा’चे काही ताजे फोटो आणि ती सध्या काय करतेय, याबद्दलची माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.



‘गुंजा’ने आपल्या दमदार अभिनयामुळे आणि सुमधूर हास्याने लोकांची मने जिंकली होती. आज इतक्या वर्षांनंतरही ‘गुंजा’चे अभिजात सौंदर्य आणि ते सुमधूर हास्य कायम आहे.


होय, आजही ‘गुंजा’  अर्थात साधना सिंह तितकीच सुंदर दिसते. गेल्या अनेक वर्षांत साधना चित्रपटांत दिसलेली नाही. पण सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे आणि आपल्या सोशल अकाऊंटवर रोज नव-नवे फोटो पोस्ट करत असते.



साधना उत्तर प्रदेशातील वाराणसीत राहते. तिचे बहुतांश फोटो गंगेकाठी काढलेले दिसतात. या फोटोतील साधना पाहून ‘गुंजा’ आठवणी नाही तर नवल!!





खरे तर साधनाला कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते.  एकदा ती तिच्या बहिणीसोबत शूटींग पाहायला गेली होती. पण याठिकाणी साधनाच्या सौंदर्याने सर्वांना अशी काही भूरळ पाडली की, तिथेच तिला चित्रपटात काम करण्याची आॅफर मिळाली. ‘नदीया के पार’ या चित्रपटानंतर ‘ससुराल’,‘तुलसी’,‘औरत और पत्थर’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. यानंतर तिने भोजपुरी निर्माता राजकुमार शाहाबादीसोबत लग्न केले आणि कायमची संसारात रमली.

Web Title: Where is the river of 'Nadiya Paro', 'Gunja'? If you want to know, then definitely read !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.