Next

नवाब मलिकांचा खळबळजनक सवाल Nawab Malik reaction on Sanatan connection with Dawood

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 05:55 PM2021-11-10T17:55:07+5:302021-11-10T17:56:04+5:30

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक गेले काही दिवस चर्चेत आहेत. आर्यन खान, एनसीबी, समीर वानखेडे, क्रांती रेडकर आणि भाजपवर आरोप करून खळबळ माजवणाऱ्या मलिकांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि अनेक धक्कादायक वक्तव्य केली. खरंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करत, बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्यांकडून मलिकांनी जमीन खरेदी केल्याचंही वक्तव्य केलंय. अर्थात हे सगळे आरोप मलिकांनी फेटाळून लावले आहेत. आणि ते करताना त्यांनी सनातन संस्थेबाबतही मोठा सवाल उपस्थित केलाय. दाऊदचं कोकणातलं घर सनातनने विकत घेतलं म्हणून सनातनचा दाऊदशी संबंध आहे का? असा रोखठोक सवालच त्यांनी उपस्थित केलाय. पाहूयात नवाब मलिक काय म्हणालेत