Santosh Jagtap Murder Case: आर्थिक हितसंबंध, पूर्ववैमनस्याबरोबर वर्चस्वातून झाला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 12:46 PM2021-10-25T12:46:24+5:302021-10-25T12:46:31+5:30

संतोष जगताप याचा उरूळी कांचन हॉटेल सोनाईमध्ये गोळ्या झाडून खून केल्यानंतर फरार झालेल्या दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने ३० तासांच्या आत अटक केली

santosh jagtap murder case financial interests premeditated murder | Santosh Jagtap Murder Case: आर्थिक हितसंबंध, पूर्ववैमनस्याबरोबर वर्चस्वातून झाला खून

Santosh Jagtap Murder Case: आर्थिक हितसंबंध, पूर्ववैमनस्याबरोबर वर्चस्वातून झाला खून

googlenewsNext
ठळक मुद्देसंतोष जगताप याच्या खुनाच्या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता

पुणे : दौंड तालुक्यातील राहू येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी संतोष जगताप याचा उरूळी कांचन हॉटेल सोनाईमध्ये गोळ्या झाडून खून केल्यानंतर फरार झालेल्या दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने ३० तासांच्या आत अटक केली. दोघे फरार झाल्यानंतर इंदारपूर येथील पळसदेव गावातील शेतात लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना जेरबंद करण्यात आले. आर्थिक हितसंबंध, पूर्ववैमनस्य तसेच वाळू तस्करीच्या वर्चस्ववादातून हा खून झाला असण्याची शक्यता असून या खूनामागे नेमका हात कोणाचा याचा शोध सुरु असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पवन गोरख मिसाळ (वय २९) आणि महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २६ दोघेही रा. दत्तवाडी, उरूळी कांचन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आदलिंगे याच्यावर एक खुनाचा गुन्हा आणि एक खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे, तर मिसाळ याच्यावर २ आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल आहेत. संतोष जगताप याच्यावर एक दुहरी हत्येबरोबर आणखी एक खुनाचा गुन्हा दाखल होता. या दोन्ही गुन्ह्यात जगताप जामिनावर बाहेर होता. पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलिस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, उप निरीक्षक सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, नितीन शिंदे, रमेश मेमाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पाठलाग होत असल्याचा आला होता संशय

संतोष जगताप याने शुक्रवारी (दि. २२) रोजी केडगाव येथील एका दुकानाचे उदघाटन केल्यानंतर तो त्याच्या गाडीतून दुपारी उरूळी कांचनच्या दिशेने येत असताना आपला कोणीतरी पाठलाग करत असल्याची चाहूल त्याला लागली होती. याच दरम्यान दुपारी संतोष जगताप आणि त्याचे साथीदार उरूळी कांचन येथील हॉटेल सोनाई मध्ये जेवण्यासाठी थांबले. हल्ला होण्याच्या भितीपोटी हॉटेलमध्ये न बसता तो टेरेसवर जेवण करायला बसला होता. त्यावेळी त्याने मुख्य शटर बंद केले. जेवण करुन खाली आल्यानंतर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्याचा खून केला. यावेळी दोन गटात फायरिंग झाले त्यामध्ये स्वागत खैरे या सराईताचा देखील खून झाला. तर जगतापचा अंगरक्षक शैलेंद्रसिंग रामबहाद्दूर सिंग गंभीर हा गंभीर जखमी झाला.

वाळू तस्करी...

संतोष जगताप याच्या खुनाच्या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. ही घटना घडण्यामध्ये परस्पर विरोधी असलेले वाद, वाळू तस्करी, आर्थिक हितसंबंध तसेच वर्चस्ववाद यातून हा प्रकार घडल्याची शक्यता अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: santosh jagtap murder case financial interests premeditated murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.