Women's Premier League इनसाईड स्टोरी; काव्या मारनचा होता 'मुंबई'वर डोळा, अंबानींची ८ संघांवर बोली!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) महिला प्रीमियर लीगच्या ( Women's Premier League) पाचही संघांच्या फ्रँचायझींची नावे जाहीर केली. SRHची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) ही मुंबई फ्रँचायझीसाठी प्रयत्नशील होती, परंतु ३०० कोटी मोजूनही तिला यश मिळाले नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) महिला प्रीमियर लीगच्या ( Women's Premier League) पाचही संघांच्या फ्रँचायझींची नावे जाहीर केली. यामध्ये आयपीएलमध्ये खेळणाऱ्या संघांची मालकी असलेल्या तीन कंपन्यांचा समावेश आहे. सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स यांची बोली अयशस्वी ठरली. SRHची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) ही मुंबई फ्रँचायझीसाठी प्रयत्नशील होती, परंतु ३०० कोटी मोजूनही तिला यश मिळाले नाही.

अदानी समूहाने अहमदाबादची फ्रँचायझी १२८९ कोटी रुपयांना विकत घेतली. मुंबईची फ्रँचायझी मुंबई इंडियन्स ९१२ कोटी रुपयांना, बंगळुरूची फ्रँचायझी RCBने ९०१ कोटी रुपयांना, जीएमआर ग्रुपने दिल्लीची फ्रँचायझी ८१० कोटी रुपयांना आणि कॅप्री ग्रुपने लखनौची फ्रँचायझी ७५७ कोटी रुपयांना विकत घेतली. पाचही संघ एकूण ४६६९.९९ कोटी रुपयांना विकले गेले.

अदानी समूहाने महिला प्रीमियर लीग फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी सर्वात मोठी बोली लावली. त्यांनी अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकाता या पाच शहरांसाठी १२८९ कोटी रुपयांची बोली लावली. बीसीसीआयच्या नियमांनुसार, जर एखाद्या फ्रँचायझीने एक किंवा अधिक शहरांसाठी सर्वाधिक रकमेची बोली लावली, तर ती आपल्या मनाचे कोणतेही शहर निवडू शकते आणि त्यांनी अहमदाबादची निवड केली.

महिला प्रीमियर लीगच्या फ्रँचायझीसाठी १० शहरांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. बंगळुरू आणि चेन्नईसारख्या शहरांच्या नावावर सर्वाधिक बोली लावण्यात आली. अपोलो पाईप्स, कॅप्री ग्लोबल, पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, श्रीमान फायनान्स आणि टॉरेंट ग्रुपने चेन्नई फ्रँचायझीसाठी प्रयत्न केले होते.

बंगळुरू आणि चेन्नई यांच्यासाठी सर्वाधिक १२-१२ कंपन्यांनी बोली लावली होती, तर तिसऱ्या क्रमांकावर इंदूरचे नाव होते व त्यांच्यासाठी ११ फ्रँचायझींनी बोली लावली होती. मुंबईवर किमान चार कंपन्यांनी बोली लावली होती. त्यात सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाइट रायडर्स, कॅप्री ग्लोबल यांचा समावेश होता. SRH ने ३०० कोटींची बोली लावलेली, परंतु मुंबई इंडियन्सने ९७१ कोटींसह बाजी मारली.

रॉयल मल्टीस्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने आयपीएल २००८ मध्ये राजस्थानची फ्रँचायझीसाठी १० वर्षांसाठी सुमारे ५४५ कोटी रुपयांची सर्वात कमी बोली लावली होती. रॉयल्सने पुन्हा एकदा महिला प्रीमियर लीगसाठी तीन शहरांमध्ये १७६ कोटी (इंदूर), १७८ कोटी (धर्मशाला) आणि १८० कोटी (गुवाहाटी) साठी तीन बोली लावल्या. मात्र यावेळी त्यांना एकही शहर मिळाले नाही.

मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने त्याचे मालक आकाश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली आठ शहरांवर बोली लावली. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व बोलींमध्ये ०.०३ कोटी रुपयांची तफावत होती. मुंबईसाठी गुवाहाटीसाठी 912.78 कोटी रुपये, इंदूरसाठी 912.81 कोटी रुपये, लखनऊसाठी 912.84 कोटी रुपये, कोलकातासाठी 912.87 कोटी रुपये, चेन्नईसाठी 912.90 कोटी रुपये, बेंगळुरूसाठी 912.93 कोटी रुपये, दिल्लीसाठी 912.96 कोटी रुपये आणि त्यानंतर सर्वात जास्त बोली त्यांच्या मुंबईसाठी 912.99 कोटी रुपये करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्याच शहर मुंबईचा महिला संघ तयार करण्याचा अधिकार मिळाला.

IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या मालकीची कंपनीने कोलकाता (. 691 कोटी) आणि बंगळुरू (रु. 901 कोटी) या दोन शहरांसाठी सर्वात कमी बोली लावली. लखनौची फ्रँचायझी घेतलेल्या कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने सात शहरांवर बोली लावली होती. ज्यामध्ये त्याला 757 कोटींमध्ये लखनऊ शहर संघ तयार करण्याचा अधिकार मिळाला.