Sohail Khan Birthday : मलायका इतकीच ग्लॅमरस आहे सोहेल खानची पत्नी, अशी आहे लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 08:00 AM2019-12-20T08:00:00+5:302019-12-20T08:00:02+5:30

Sohail Khan Birthday : अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सोहेल खान याचा आज वाढदिवस.

sohail khan birthday special marriage life with seema sachdev khan | Sohail Khan Birthday : मलायका इतकीच ग्लॅमरस आहे सोहेल खानची पत्नी, अशी आहे लव्हस्टोरी

Sohail Khan Birthday : मलायका इतकीच ग्लॅमरस आहे सोहेल खानची पत्नी, अशी आहे लव्हस्टोरी

googlenewsNext
ठळक मुद्देजम बसत नाही म्हटल्यावर २००८ मध्ये प्रितीने बॉलिवूड करिअर सोडून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सोहेल खान याचा आज वाढदिवस. सोहेल खान म्हणायला अभिनेता आणि निर्माता आहे. पण सलमान खानचा भाऊ हीच त्याची ओळख जास्त मोठी आहे. सोहेलने अनेक चित्रपटात भूमिका केल्यात. पण त्याला म्हणावे तसे यश लाभले नाही. अर्थात आज आम्ही सोहेलच्या फिल्मी करिअरबद्दल नाही तर त्याच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत. होय, घरच्यांचा विरोध पत्करून सोहेलने लग्न केले. 

होय, सोहेल खानने 1997 मध्ये दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. ‘प्यार किया तो डरना क्या’ हा दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला सिनेमा होता. याच दरम्यान एक मुलगी फॅशन डिझाईनिंगमध्ये करिअर करण्यासाठी दिल्लीतून मुंबईला आली.

सोहेल व तिची योगायोगाने भेट झाली आणि पहिल्याच नजरेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. या मुलीचे नाव होते. सीमा सचदेव. आज सीमा सोहेल खानची पत्नी आहे.


सीमा व सोहेल लग्न करू इच्छित होते. पण या लग्नाला कुटुंबाचा विरोध होता. मग काय, ज्या दिवशी ‘प्यार किया तो डरना क्या’ रिलीज झाला, त्याचदिवशी सोहेल व सीमा दोघेही घरातून पळाले आणि आर्य मंदिरात दोघांनीही लग्न केले.

अर्थात यानंतर दोन्ही कुटुंबानी हे लग्न मान्य केले. यानंतर सोहेल व सीमाचा ‘निकाह’ही झाला. या दोघांना निर्वान व योहान अशी दोन मुले आहेत.

सोहेलने लग्नानंतर निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. पण निर्माता म्हणून तो फार यश मिळवू शकला नाही. सीमाने मात्र फॅशन डिझाईनिंग क्षेत्रात मोठे नाव कमावले. अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांसाठी ती फॅशन डिझाईनिंग करते.

सीमा ग्लॅमरस आयुष्य जगते. फारशी लाईमलाईटमध्ये नसली तरी बॉलिवूडच्या पार्ट्यांना मात्र ती हमखास दिसते.

Web Title: sohail khan birthday special marriage life with seema sachdev khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.