सुखद ! परतीच्या पावसाने माजलगाव धरण 100 टक्के भरले; बीडसह १२ गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 04:05 PM2017-10-24T16:05:30+5:302017-10-24T16:09:49+5:30

परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी धरणाची पाणी पातळी   431.80 मिटर झाल्याने धरण १०० टक्के भरले आहे.  

Pleasant! Majulgaon dam completes 100 percent return; The question of water of 12 villages with Beed was eradicated | सुखद ! परतीच्या पावसाने माजलगाव धरण 100 टक्के भरले; बीडसह १२ गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला

सुखद ! परतीच्या पावसाने माजलगाव धरण 100 टक्के भरले; बीडसह १२ गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला

googlenewsNext
ठळक मुद्दे परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.  बीड, माजलगाव शहरासह तालुक्यातील १२ गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे दूर झाला आहे .

माजलगांव, ( बीड ) : परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी धरणाची पाणी पातळी   431.80 मिटर झाल्याने धरण १०० टक्के भरले आहे.  बीड, माजलगाव शहरासह तालुक्यातील १२ गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे दूर झाला आहे .

मागील १ महिन्यात परतीच्या पावसाने माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. 1 आॅगस्ट रोजी माजलगांव धरणाची पाणीपातळी 430.62 मिटर एवढी होती. त्यानंतर धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणात येणा-या पाण्याची आवक वाढली. एक महिण्यात धरणाची पाणी पातळी सव्वा मिटरने वाढून आज सकाळी ते पुर्ण क्षमतेने भरले आहे . 

नदीपात्रातून आवक सुरूच 
सध्या धरणाची पाणी पातळी 431.80 मिटर एवढी आहे. तसेच धरणात 560 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक सिंधफणा व कुंडलिका नदी पात्रातून सुरू आहे. धरणात 454 दलघमी एवढा पाणीसाठा असून त्यातील 312 दलघमी मिटर पाणी उपयुक्त पाणीसाठा आहे. २०११ नंतर मागील वर्षीसुद्धा परतीच्या पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यामुळे धरण क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला 
या धरणाच्या पाण्यातून बीड, माजलगांव या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. यासोबतच माजलगाव शहराजवळील ११ खेड्यांची पाणी पुरवठा योजना याच पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे या गावांचाही पाणीप्रश्न सुटला आहे.

Web Title: Pleasant! Majulgaon dam completes 100 percent return; The question of water of 12 villages with Beed was eradicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण