सालीला पाहताच दाजी झाले आऊट ऑफ कंट्रोल, भर लग्नात केले असे काही की पाहुणे झाले शॉक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 16:42 IST2021-10-14T16:40:04+5:302021-10-14T16:42:54+5:30
असं म्हणतात 'साली आधी घरवाली'. पण एका लग्नात नवऱ्याने हे जास्तच मनावर घेतलं. भर लग्नसमारंभात त्याने आपल्या साली म्हणजेच मेव्हणीसोबत असं काही केलं की पाहुणेही शॉक झाले.

सालीला पाहताच दाजी झाले आऊट ऑफ कंट्रोल, भर लग्नात केले असे काही की पाहुणे झाले शॉक!
असं म्हणतात 'साली आधी घरवाली'. पण एका लग्नात नवऱ्याने हे जास्तच मनावर घेतलं. भर लग्नसमारंभात त्याने आपल्या साली म्हणजेच मेव्हणीसोबत असं काही केलं की पाहुणेही शॉक झाले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.
मेहुणीला पाहून लग्नातच दाजी तिच्यावर फिदा झाले. त्यांच्या स्वतःवरील ताबा सुटला. मेहुणीजवळ जाऊन त्यांनी लग्नातच सर्वांसमोर असं काही केलं की तिथं उपस्थित असणारा प्रत्येक जण थक्क झाला. या मेहुणी आणि दाजीकडेच पाहत राहिला. आता असं या मेहुणीने नेमकं काय केलं ज्यामुळे दाजी तिला पाहताच आऊट ऑफ कंट्रोल झाला आणि नेमकं त्याने काय केलं ते तुम्ही व्हिडीओतच पाहा.
एका पंजाबी लग्नाचा हा व्हिडीओ आहे. मेहुणी पंजाबी गाण्यावर ठुमके लगावते आहे. मेहुणीचा डान्स पाहून दाजीही इम्प्रेस होतो. तोही तिच्यासोबत गाण्यावर थिरकतो. सोबतच आपल्या खिशातील पैशांच्या नोटा काढून तो तिच्यावर उधळतो. दाजीला मेहुणीचा डान्स इतका आवडला की तो तिच्यावर पैसे उडवतच जातो. यानंतर तिथं उपस्थित असलेले नातेवाईक, पाहुणेसुद्धा हे सर्व पाहतच राहतात.
पंजाबी कपल इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जर तुम्ही कधी या गाण्यावर आपल्या दाजींसोबत डान्स केला नाही तर काहीच केलं नाही, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. दाजी-मेहुणीचा ही जोडी, त्यांच्यातील बाँडिंग, केमिस्ट्री नेटिझन्सना आवडली आहे.