डग्ज तस्करी; ३ संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:20 AM2020-10-01T11:20:54+5:302020-10-01T11:21:30+5:30

मेफेड्रॉन या अत्यंत महागड्या समजल्या जाणाऱ्या अमली पदार्थासोबतच चरस घेऊन औरंगाबाद शहरात आलेल्या दोन तस्करांना वेदांत नगर पोलीसांनी मंगळवारी ताब्यात  घेतल्यानंतर बुधवारी  आणखी  तीन संशयितांना अटक केली आहे.

Drugs smuggling; 3 suspects arrested | डग्ज तस्करी; ३ संशयितांना अटक

डग्ज तस्करी; ३ संशयितांना अटक

googlenewsNext

औरंगाबाद : मेफेड्रॉन या अत्यंत महागड्या समजल्या जाणाऱ्या अमली पदार्थासोबतच चरस घेऊन औरंगाबाद शहरात आलेल्या दोन तस्करांना  वेदांत  नगर पोलीसांनी मंगळवारी ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी आणखी तीन संशयितांना अटक केली आहे. तसेच ड्रग तस्करांचे शहरात आणखी  कोणासोबत कनेक्शन आहे, याविषयी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बारी कॉलनी येथील छोटू चाऊस, आरेफ कॉलनी येथील फैजान खान आणि आसेफिया कॉलनी येथील अकबर हाश्मी अशी  संशयितांची नावे आहेत.  मुंबईहून शहरात जीपने अमली पदार्थ आणणाऱ्या आशिक अली मुसा कुरेशी आणि नुरोद्दीन बद्रोद्दीन सय्यद यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. २५ ग्रॅम चरस आणि १० ग्रॅम मॅफेड्रोन असे ६३ हजारांचे अमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले होते. दोन्ही ड्रग तस्करांना न्यायालयाने  सोमवारपर्यंत  पोलीस कोठडी ठोठावली आहे. दोन्ही आरोपींची वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी चौकशी केली. 

आरोपींच्या व्हॉट्सॲप आणि मोबाईल कॉल डिटेेलच्या आधारे गुप्त पथकाने छोटू चाऊसला बारी काॅलनीतून उचलले.  यानंतर फैजान आणि अकबर  हाश्मी  या दोघांनाही ताब्यात घेतले. व्हॉट्सॲप चॅट आणि मोबाईल कॉल डिटेलच्या आधारे आशिकअली  आणि नुरोद्दीनकडून ड्रग्ज  खरेदी  करणाऱ्यांपर्यंत पोहोचणे पाेलिसांना शक्य होणार आहे.

Web Title: Drugs smuggling; 3 suspects arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.