पंडित नवरदेवाला म्हणाला - 'दारूच्या अडड्यावर कधी जाऊ नको'; पार पडेपर्यंत हसू लागली नवरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 03:00 PM2021-11-24T15:00:21+5:302021-11-24T15:03:35+5:30

Bride-Groom Viral Video : नवरी-नवरदेवासमोर पंडितजी मंत्र म्हणत होते. तेव्हा ते असं काही बोलतात की, नवरी-नवरदेवासोबत आजूबाजूचे लोक पोट धरून हसू लागतात.

Viral Video : Panditji told the groom in front of bride never go to the den of drunkards | पंडित नवरदेवाला म्हणाला - 'दारूच्या अडड्यावर कधी जाऊ नको'; पार पडेपर्यंत हसू लागली नवरी

पंडित नवरदेवाला म्हणाला - 'दारूच्या अडड्यावर कधी जाऊ नको'; पार पडेपर्यंत हसू लागली नवरी

Next

लग्न मंडपात जेव्हा नवरी आणि नवरदेव एकत्र बसलेले असतात तेव्हा पंडितजी मंत्रांचा जप करतात. यावेळी काही पंडित असं काही बोलतात ज्याने लोकांच्या चेहऱ्या हसू येतं. अनेकदा तर पंडितजी नवरदेवाला समजावतानाही दिसतात की, दुसऱ्या महिलेकडे बघू नये, साथीदाराला एकटं सोडू नये, नेहमी सोबत रहावे इत्यादी. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ (Bride-Groom Viral Video) बघून तुम्हीही लोटपोट होऊन हसाल.

नवरी-नवरदेवासमोर पंडितजी मंत्र म्हणत होते. तेव्हा ते असं काही बोलतात की, नवरी-नवरदेवासोबत आजूबाजूचे लोक पोट धरून हसू लागतात. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, नवरदेव सुद्धा पंडितजी जे सांगतात ते लक्ष देऊन ऐकत आहे. पंडितजी सांगतात की, घरात जेवढं धन-धान्य, वस्त्र, भोजन पदार्थ इत्यादी सगळं पत्नीला अर्पण करावं लागेल. तुम्ही बागेत एकटं जायचं नाहीय. दारूच्या अड्ड्यावर जायचं नाही आणि जास्तीचं हसायचं सुद्धा नाहीये. घराबाहेर कधीही झोपायचं नाही. तसेच बाहेर जेवणही करायचं नाही'.

पंडितच्या सर्व बोलण्यावर नवरी-नवरदेवासहीत घरातील लोक आणि पाहुणे जोरजोरात हसू लागतात. हा व्हिडीओ व्हायरल  झाला असून यूजर्सच्याही यावर मजेदार कमेंट्स येत आहेत. dulhaniyaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं. 
 

Web Title: Viral Video : Panditji told the groom in front of bride never go to the den of drunkards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.