पैसे हिसकावणा-या रिक्षाचालकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:05 AM2018-01-01T00:05:31+5:302018-01-01T00:05:56+5:30

मोबाईल आणि खिशातील ५०० रुपये हिसकावणाºया रिक्षाचालकावर दोन तरुणांनी वस्तरा आणि चाकूने सपासप वार करून आणि सिमेंट गट्टूने ठेचून क्रूर पद्धतीने हत्या केली. एवढेच नव्हे तर मृताचा गळा आवळून त्याचे प्रेत सलीम अली सरोवराच्या पाण्यात टाकल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि.३०) डिसेंबर रोजी रात्री साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास रोजाबाग येथे घडली. ही घटना मध्यरात्री उघडकीस आली.

 Crushing murder of the autorickshaw driver of money grabbing | पैसे हिसकावणा-या रिक्षाचालकाची हत्या

पैसे हिसकावणा-या रिक्षाचालकाची हत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मोबाईल आणि खिशातील ५०० रुपये हिसकावणाºया रिक्षाचालकावर दोन तरुणांनी वस्तरा आणि चाकूने सपासप वार करून आणि सिमेंट गट्टूने ठेचून क्रूर पद्धतीने हत्या केली. एवढेच नव्हे तर मृताचा गळा आवळून त्याचे प्रेत सलीम अली सरोवराच्या पाण्यात टाकल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि.३०) डिसेंबर रोजी रात्री साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास रोजाबाग येथे घडली. ही घटना मध्यरात्री उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन मारेकºयांना अटक केली.
शेख सर्फराज शेख सांडू (१८) आणि शेख अदिल शेख रफिक (१९, दोघे रा. रोजाबाग) अशी आरोपींची नावे आहेत. फेरोज खान फारुख खान (१९, रा. रोजाबाग) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, मृत आणि आरोपी ऐकमेकांचे ओळखीचे ते अल्पवयीन असल्यापासून ते नेहमी सलीम अली सरोवर परिसरात नशा करीत बसत. शनिवारी रात्री ६.३० वाजेच्या सुमारास तिघे सलीम अली सरोवराच्या मागील बाजूच्या बाभळबंदात नशा करीत बसले होते. यानंतर किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. यावेळी फिरोजने एका जणाच्या खिशातून पाचशे रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला. यावेळी झालेल्या झटापटीत फेरोजने सर्फराजच्या हातावर वस्तºयाने वार केला. यामुळे दोघे चिडले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला चढविला. यावेळी एकाने फेरोजचे हात पकडले तर दुसºयाने त्याच्या गळ्यावर ब्लेड आणि चाकूने सपासप वार केले. या घटनेत फेरोज रक्तबंबाळ होऊन खाली पडला. यानंतर तेथील सिमेंटच्या गट्टूने त्याचे डोके ठेचले. यामुळे गट्टूचे दोन ते तीन तुकडे झाले. तो मृत झाल्याची खात्री करण्यासाठी त्यांनी त्याच्याच कमरेचा चामडी पट्ट्याने गळा आवळला आणि सलीम अली सरोवराच्या पाण्यात ओढत नेले. पाण्यात बुडवून गळ्यातल्या बेल्टच्या दुसºया टोकाने तेथील बाभळीच्या फांदीला त्यास लटकावले. सुमारे अर्धा ते पाऊणतास आरोपींनी हे कृत्य केले. यानंतर ते तेथून पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास मिळाली. वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहायक निरीक्षक शैलजा जानकर आणि कर्मचाºयांनी दोन्ही आरोपींना रोजाबाग येथे पकडले. आरोपींनी दाखविलेल्या घटनास्थळी जाऊन मृताचे प्रेत घाटी रुग्णालयात हलविले. याप्रकरणी मृताचे वडील फारुख खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
घटनास्थळाला वरिष्ठ अधिकाºयांची भेट
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पो. नि. कदम, सहायक निरीक्षक शैलजा जानकर आणि कर्मचाºयांनी आज रविवारी दुपारी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करून तेथे सापडलेल्या ब्लेड, वस्तरा, चाकू आणि बुटाचे जोड आणि मांसाचे तुकडे जप्त केले. रक्ताचे डाग असलेले कपडेही तेथे पोलिसांना मिळाले. आरोपी पळण्याच्या तयारीत होते. दोन्ही आरोपींच्या खिशात प्रत्येकी पाचशे रुपये होते. मात्र, तत्पूर्वीच या घटनेची माहिती आरोपींच्या वडिलांनी पोलिसांना कळविली. यानंतर पो.नि. कदम आणि कर्मचाºयांनी लगेच रोजाबाग गाठून दोन्ही संशयिताना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत घटनास्थळ दाखविले.

Web Title:  Crushing murder of the autorickshaw driver of money grabbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.