पावसाळा जाऊन हिवाळा आला; तरी ही सेलू येथील शेतक-यांना पाणीस्त्रोत अधिग्रहणाचा मोबदला मिळेना 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 06:32 PM2017-12-06T18:32:34+5:302017-12-06T18:33:17+5:30

उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही.

the farmers from Selu yet not got compensation from the water supply acquisition | पावसाळा जाऊन हिवाळा आला; तरी ही सेलू येथील शेतक-यांना पाणीस्त्रोत अधिग्रहणाचा मोबदला मिळेना 

पावसाळा जाऊन हिवाळा आला; तरी ही सेलू येथील शेतक-यांना पाणीस्त्रोत अधिग्रहणाचा मोबदला मिळेना 

googlenewsNext

सेलू (परभणी) :  उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. मोबदला मिळावा या साठी १४ गावातील २१ शेतक-यांना पंचायत समितीच्या कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.

सेलू तालुक्यातील हट्टा, कुडा, लाडनांद्रा, मापा, राव्हा, कान्हड, गव्हा, आडगाव,तांदूळवाडी, पार्डी, कौसडी, हादगाव, जळवा जिवाजी, रायपूर, वलंगवाडी या गावात खाजगी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. तर नागठाणा, डिग्रस जहागीर, गुळखंड, पिंपळगाव गोसावी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. एप्रिल महिन्यात तालुक्यातील १८ गावातील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.

यातील ४ गावाना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. प्रशासनाने उर्वरित १४ गावातील २१ पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला होता. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात १४ गावातील खाजगी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. त्याद्वारे ग्रामपंचायतींनी गावातील पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला होता. गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतक-यांनी उपलब्ध पाण्याचे स्त्रोत अधिग्रहणासाठी दिले. मात्र सहा महिने उलटूनही अधिग्रहणाचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. कान्हड या गावात दोन खाजगी पाणीस्त्रोत अधिग्रहण करण्यात आले होते. तर रायपूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे या गावातील ५ पाण्याचे स्त्रोत तसेच जवळा येथे ३ पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा करण्यात आला होता.

१४ गावातील २१ शेतक-यांचे जवळपास २ लाख ८४ हजार रुपयांच्या अधिग्रहणाचा मोबदला रखडला आहे. तसेच टँकरचेही ४ लाखाहून अधिक बिल अदा करण्यात आले नाही. दरम्यान, उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. परंतु, ज्या शेतक-यांचे पाणीस्त्रोत अधिग्रहण केले. त्या शेतक-यांना मोबदला देताना विलंब होत असल्यामुळे त्या शेतक-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. काही शेतकºयांनी शेतातील पिकांना पाणी न देता गावातील टंचाई लक्षात घेऊन पाणीस्त्रोत गावासाठी उपलब्ध करून दिले होते. 

रक्कम मिळताच मोबदला देण्यात येईल 
तालुक्यातील १४ गावात २१ स्त्रोत अधिग्रहण करून तीन महिने पाणीपुरवठा करण्यात आला होता. या शेतक-यांच्या अधिग्रहणाचा मोबदला देण्यासाठी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती कार्यालयात रक्कम मिळताच संबंधित शेतक-यांच्या खात्यावर अधिग्रहणाचा मोबदला दिली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे यु.बी. जाधव यांनी दिली. 

Web Title: the farmers from Selu yet not got compensation from the water supply acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.