पुणे-नगर महामार्गावर विचित्र भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 10:12 PM2022-01-23T22:12:59+5:302022-01-23T22:26:30+5:30

शिक्रापूर ता. शिरूर येथील २४वा मैल येथे पुणे नगर महामार्गावर भीषण अपघात झाला तीन वाहनांचा विचित्र  अपघातात ४ जणांनाचा म्रूतू झाला .

Bizarre accident on Pune-Nagar highway, 4 killed on the spot | पुणे-नगर महामार्गावर विचित्र भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

पुणे-नगर महामार्गावर विचित्र भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

googlenewsNext

शिक्रापूर ता. शिरूर येथील २४वा मैल येथे पुणे नगर महामार्गावर भीषण अपघात झाला तीन वाहनांचा विचित्र  अपघातात ४ जणांनाचा म्रूतू झाला .तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील २४ वा मैल इथे भीषण अपघात झाला. ट्रकने कार आणि दोन टू व्हीलर गाड्यांना जोरदार धडक दिली. हा भीषण अपघात घडला. ट्रक पुण्याकडून नगरच्या दिशेला जात होता. तर फोर व्हीलर वाहन आणि दोन्ही टू व्हीलर नगरकडून पुण्याच्या दिशेने चालले होते.ट्रक डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने जाऊन कार आणि दोन बाईकला धडकला. या भीषण अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली आहे. अपघातात बाईकवरील विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे या पती पत्नी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील लिना निकसे यांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. मृता मधील एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नसून जखमींची ही ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. अधिक तपास शिक्रापूर पोलिस करत आहे.

Web Title: Bizarre accident on Pune-Nagar highway, 4 killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.