खुनानंतर अटक झाली नसती तर चौकडीला करायचा होता आणखी एका महिलेचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 07:26 PM2022-05-13T19:26:39+5:302022-05-13T19:28:01+5:30

सुशीला पवार खून प्रकरण : मुकुंदवाडी येथील सुशीला पवार यांची नातलग मुलीसह तिच्या प्रियकराने चाकूने गळा चिरून ८ मे च्या रात्री हत्या केली होती, त्यानंतर चौकडीला आणखी एका महिलेचा काढायचा होता काटा

If the arrest had not been made after the murder, the quartet would have wanted to kill another woman | खुनानंतर अटक झाली नसती तर चौकडीला करायचा होता आणखी एका महिलेचा खून

खुनानंतर अटक झाली नसती तर चौकडीला करायचा होता आणखी एका महिलेचा खून

googlenewsNext

औरंगाबाद : प्रेमात अडथळा ठरत असलेल्या सुशीला पवार यांना बाळापूर शिवारात बोलावून घेत हत्या केल्याचा प्रकार ९ मे रोजी सकाळी उघडकीस आला होता. खुनापूर्वी १४ वर्षांच्या मुलीनेच थाप मारून सुशीला यांना बोलावून घेतले होते. या चौकडीने आणखी एका महिलेचा तीन दिवसांनी खून करण्याची योजना बनवली होती, अशी धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.

मुकुंदवाडी येथील सुशीला पवार यांची नातलग मुलीसह तिच्या प्रियकराने चाकूने गळा चिरून ८ मे च्या रात्री हत्या केली होती. चिकलठाणा पोलिसांनी तो प्रियकर दीपक भताडे, त्याचा मित्र सुनील ऊर्फ राहुल संजय महेर या दोघांसह दोन विधिसंघर्षग्रस्त मुलींना ताब्यात घेतले होते. दोघांना पोलीस कोठडी मिळाली. मुलींना बालसुधारगृहात पाठविले. पोलीस कोठडीत आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, १७ व १४ वर्षांच्या या मुली मैत्रिणी आहेत. या दोघींच्या आईसुद्धा मैत्रिणी आहेत. १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात सुशीला पवार अडथळा ठरत असल्यामुळे त्यांचा खून करण्यात आला.

नियोजन करून दुसऱ्याच्या नावावर खरेदी केलेल्या सीमकार्डवरून १४ वर्षांच्या मुलीने फोन करून सुशीला यांना सांगितले की, १७ वर्षांची मुलगी व तिचा प्रियकर दीपक हे तुम्ही बटईने घेतलेल्या शेतात आहेत. त्यांनी मला सोबत आणले होते. त्यांच्यापासून दूर येऊन तुम्हाला फोन लावल्याची बतावणी केली. या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुशीला दुचाकीवरून बाळापूर शिवारात रात्री ११ वाजेच्या सुमारास गेल्या. तेथे त्यांचा खून झाला. हा खून पचविल्यानंतर सुशीला यांची मैत्रीण आणि १४ वर्षांच्या मुलीची नातेवाईक असलेल्या महिलेचाही खून करण्याची योजना त्यांनी बनवलेली होती, असेही चौकशीत स्पष्ट झाले.

खुनाचे हत्यार जप्त
दीपक याने सुशीला यांना मारण्यासाठी खरेदी केलेला चाकू खून केल्यानंतर फेकून दिला होता. हा चाकू चिकलठाणा पोलिसांनी मिळवला आहे. तसेच ज्याच्याकडून विकत घेतला, त्यांचाही जबाब नोंदवला आहे. अधिक तपास निरीक्षक देविदास गात करीत आहेत.

Web Title: If the arrest had not been made after the murder, the quartet would have wanted to kill another woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.